इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. २६ मार्चपासून आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होणार आहे. तर २९ मे रोजी अंतिम सामना होईल. तत्पूर्वी आयपीएल फ्रँचायझींना धक्क्यावर धक्के बसत आहेत. आयपीएलदरम्यान काही संघ आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये व्यस्त असल्यामुळे परदेशी खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये अनुपलब्ध असतील.
दरम्यान नव्या लखनऊ सुपर जायंट्स संघाला यापेक्षाही मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज मार्क वुड संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. मात्र लगेचच त्यांच्यासाठी एक सुखद बातमीही आली आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज दुष्मता चमीरा दुखापतीतून बरा झाल्यामुळे आयपीएलच्या आगामी हंगामासाठी उपलब्ध असेल.
मार्क वुड आयपीएल २०२२ मधून बाहेर
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज वुड (Mark Wood Is Ruled Out Of IPL 2022) आगामी आयपीएल हंगामात (IPL 2022) आपल्या फ्रँचायझीसोबत सहभागी होऊ शकणार नाही. दुखापतीमुळे तो या संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. त्याला मागील आठवड्यात वेस्ट इंडिजविरुद्ध नॉर्थ साउंडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान उजव्या हाताच्या कोपराला (Mark Wood Elbow Injury) दुखापत झाली होती. जर तो दुखापतीनंतरही क्रिकेट खेळला तर त्याची दुखापत अजून गंभीर होऊ शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
मात्र मार्क वुड पूर्ण हंगामातून बाहेर झाल्यामुळे लखनऊ सुपर जायंट्स (lucknow Supergiants) संघाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. कारण लखनऊ संघाने मेगा लिलावात तब्बल ७ कोटी ५० लाख रुपये खर्च करत मार्क वुडला संघात सहभागी केले होते.
हेही वाचा- आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेल्या लखनऊ संघाची काय आहे ताकद अन् कमजोरी, जाणून घ्या सर्वकाही
इंग्लंडचा तिसरा खेळाडू आयपीएल २०२२ मधून बाहेर
मार्क वुड हा आयपीएल २०२२ मधून बाहेर होणारा इंग्लंडचा तिसरा क्रिकेटपटू आहे. त्याच्यापूर्वी ऍलेक्स हेल्स आणि जेसन रॉय यांनीदेखील बायो बबलला कंटाळून आयपीएलच्या आगामी हंगामातून माघार घेतली आहे.
दुष्मंता चमीरा आयपीएल २०२२साठी उपलब्ध
दुसरीकडे श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीरा दुखापतीतून बरा झाला असल्याने लखनऊ संघाकडून खेळण्यासाठी उपलब्ध असेल. त्याला भारताविरुद्धच्या मोहाली कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो पुढील बंगळुरू कसोटीतून बाहेर झाला होता. मात्र आता तो दुखापतीतून बरा झाल्याने तो आयपीएल २०२२ मध्ये खेळताना दिसेल. लखनऊ संघाने त्याला मेगा लिलावात २ कोटींना विकत घेतले होते.
लखनऊ सुपर जायंट्स संघ – केएल राहुल (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, जेसन होल्डर, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मार्क वुड, आवेश खान, अंकित राजपूत, के गॉथम, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मोहसिन खान, आयुष बडोनी, काइल मेयर्स, करण शर्मा, एविन लुईस, मयंक यादव
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022 | राजवर्धन हंगरगेकरला ‘कॅप्टनकूल’ धोनीचा सल्ला, ‘या’ गोष्टीत करायला सांगितली सुधारणा
सतरंगी यारी, रंगीबेरंगी होली; दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंनी धूमधडाक्यात साजरी केली होळी- Video
कधीकाळी मीडियम पेसर असलेला ग्लेन मॅक्सवेल कसा बनला ऑफ स्पिनर? रोचक आहे कहाणी