चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी किती वेडे असतात, याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये आणि आयपीएलमध्ये माजी कर्णधार एमएस धोनी याला भेटण्यासाठी अनेक चाहत्यांनी सुरक्षा घेरा भेदून मैदानात आल्याचे व्हिडिओ आपण पाहिले आहेत. आता असेच काहीसे, महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात पाहायला मिळाले. या सामन्यात एकच नाही, तर दोन चाहत्यांनी सुरक्षा घेरा भेदत आपल्या आवडत्या ऋतुराज गायकवाड या खेळाडूला भेटण्यासाठी मैदानात एन्ट्री केली. यादरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
एमपीएल 2023 (MPL 2023) स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स (Puneri Bappa vs Kolhapur Tuskers) संघ आमने-सामने होते. या सामन्यात पुणेरी बाप्पा (Puneri Bappa) संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर टस्कर्स (Kolhapur Tuskers) संघाने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 144 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे, पहिल्या डावात एकाही प्रेक्षकाने मैदानात एन्ट्री केली नव्हती.
कोल्हापूरच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि पवन शाह यांनी डावाची सुरुवात केली. ऋतुराजने यावेळी जबरदस्त फटकेबाजी केली. त्याने अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक साकारले. तसेच, संपूर्ण सामन्यात 27 चेंडूंचा सामना करताना 64 धावांची तडाखेबंद खेळी साकारली. या धावा करताना त्याने 5 चौकार आणि 5 षटकारांचा पाऊस पाडला. यावेळी त्याने 237.04च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या.
चाहत्याची मैदानात एन्ट्री
ऋतुराज फलंदाजी करत असतानाच चाहत्याने सुरक्षा घेरा भेदत सामन्यात व्यत्यय आणला. चाहता मैदानात आला आणि ऋतुराजच्या पायाला स्पर्श केला आणि पुन्हा धूम ठोकली. यावेळी त्याने सुरक्षा रक्षकांना चांगलाच त्रास दिला. व्हिडिओत तो मैदानाच्या सीमारेषेवरून पळताना दिसत आहे.
ऋतुराज गायकवाडला भेटण्यासाठी चाहत्याने मोडला सुरक्षा घेरा, प्रेक्षकांनीही केला एकच कल्लोळ! ????????????#म #मराठी #MPL @Maha_Sports @kreedajagat @MaheshMGW23 pic.twitter.com/nIQzqMEs2i
— Atul Waghmare (@WaghmareAtul19) June 15, 2023
याव्यतिरिक्त आणखी एका चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो डगआऊटच्या पाठीमागील स्टेडिअममधून थेट उडी मारून मैदानात एन्ट्री करतो. तसेच, ऋतुराजची भेट घेऊन सर्वांचे लक्ष वेधतो आणि पुन्हा स्टेडिअममध्ये येतो. इतर मोठ्या स्पर्धांमध्ये अशा घटना घडल्यावर कठोर कारवाई केली जाते. मात्र, एमपीएल स्पर्धेत घडलेल्या या घटनांवर कोणतीही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली नाहीये.
याला म्हणतात सुपर फॅन ❤️#MPL सामन्यात @Ruutu1331 ची भेट घेण्यासाठी चाहत्याने दाखवली चित्याची चपळाई
व्हिडिओ सौजन्य: अझर pic.twitter.com/j5oLB7t90C— #MPL ???? (@MaheshMGW23) June 15, 2023
पुणेरी बाप्पाचा दणदणीत विजय
पुणेरी बाप्पाच्या ऋतुराज आणि पवन या सलामीवीरांनी वादळी फलंदाजी करत संघाला आव्हानाच्या जवळ पोहोचवले. पवनने 48 चेंडूत 57 धावांची खेळी साकारली, तर ऋतुराजने 64 धावांची फटकेबाजी केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी तब्बल 110 धावांची भागीदारी रचली. तसेच, सामना आपल्या बाजूने वळवला. यामुळे शेवटी पुणेरी बाप्पा संघाने 14.1 षटकातच 8 विकेट्स राखून हा सामना आपल्या खिशात घातला. (maharashtra premier league ruturaj gaikwad fan break security and came into field see video in mpl 2023 first match )
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकापूर्वी ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूने तडकाफडकी घेतली निवृत्ती, 7 विश्वचषकात केलं देशाचं प्रतिनिधित्व
Ashes 2023 : कधी, कुठे आणि कशी पाहता येईल इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियातील पहिली कसोटी मॅच? वाचा लगेच