सध्या भारतात वनडे विश्वचषक खेळला जात आहे. त्यासोबतच देशांतर्गत क्रिकेटमधील सामनेदेखील विविध शहरांमध्ये खेळले जात आहेत. पुरुषांच्या अंडर 19 क्रिकेट मधील प्रमुख वनडे स्पर्धा असलेल्या विनू मंकड ट्रॉफीचा अंतिम सामना सोमवारी (30 ऑक्टोबर) इंदोर येथील होळकर स्टेडियम येथे खेळला गेला. या सामन्यात महाराष्ट्र संघाने मुंबईचा 115 धावांनी पराभव करत, विजेतेपद पटकावले.
मुंबईला पराभूत करत महाराष्ट्र U19 संघाने उंचावली विनू मंकड ट्रॉफी 🏆
अर्शिन कुलकर्णीचे शतक तर, स्वराज चव्हाणचे पाच बळी#VinooMankadTrophy #MPL #MUMvMAH pic.twitter.com/FpFkbHfXBn— Mahesh (@MaheshMGW23) October 30, 2023
होळकर स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी केली. क्रिश शहापूरकर चार धावांवर बाद झाल्यानंतर अर्शिन कुलकर्णी व दिग्विजय पाटील यांनी शतकी भागीदारी रचली. दिग्विजय याने साठ धावांचे योगदान दिले. त्यानंतर सचिन धस व कर्णधार किरण चोरमले यांनी देखील अर्धशतके साजरी केली. एमपीएलमधून नावारूपाला आलेल्या अर्शिन कुलकर्णी याने शानदार 105 धावांची खेळी केली. यामध्ये आठ चौकार व सहा षटकारांचा समावेश होता. त्यामुळे महाराष्ट्र संघाने 316 पर्यंत मजल मारली.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई संघाची सुरुवातच खराब झाली. मुंबई संघासाठी मधल्या फळीत आदित्य रावत याने 59 तर मनन भट याने 68 धावा करत संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र संघासाठी स्वराज चव्हाण यांनी सर्वाधिक पाच बळी मिळवत मुंबईचा डाव केवळ 206 धावांवर संपवला.
(Maharashtra U19 Won Vinoo Mankad Trophy 2023 Best Mumbai)
महत्वाच्या बातम्या –
शमीच्या वादळात उडाली इंग्लंडची फलंदाजी, ट्वीटरवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर
विराट शून्यावर बाद होताच इंग्लंडच्या बार्मी आर्मीने उडवली खिल्ली, भारतीय यू-ट्यूबरने केली बोलती बंद