भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेचे वारे वाहत आहे. त्यामुळे टी२० क्रिकेटची चर्चा जोरदार होत आहे. याचदरम्यान अनेक माजी क्रिकेटपटू टी२०मधील सर्वोत्तम खेळाडूंची निवड करत आहेत. नुकतेच श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि सध्याचा मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने याने देखील आपल्या ड्रीम टी२० संघातील पहिल्या पाच खेळाडूंची निवड केली आहे.
द आयसीसी रिव्ग्यूच्या एका एपिसोडमध्ये संजना गणेशनबरोबर बोलताना माहेला जयवर्धनेने (Mahela Jayawardene) सर्वोत्तम ५ टी२० खेळाडूंची (Best T20 Players) निवड केली आहे. त्याने यामध्ये शाहिन आफ्रिदी, जसप्रीत बुमराह, जोस बटलर, मोहम्मद रिझवान आणि राशिद खान यांनी निवड केली आहे.
याबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘माझ्यासाठी गोलंदाज टी२० क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहेत. राशिद खान एक चांगला फिरकीपटू असून, जो फलंदाजी देखील करू शकतो. तो सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर खूप चांगली फलंदाजी करू शकतो. तुम्ही संघसंयोजनानुसार विविध परिस्थितीत त्याचा वापर करू शकतात. तो एका डावात विविध टप्प्यात गोलंदाजी करू शकतो, जसे की पॉवर प्लेमध्ये, मधल्या षटकांमध्ये, याबरोबरच अखेरच्या षटकांमध्ये पण तो परिस्थिती तशी असेल तर चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे राशिद खान माझी पहिली पसंती असेल.’
तसेच जयवर्धनेने फलंदाजीत जोस बटलरला आणि मोहम्मद रिझवानची निवड केली. तसेच वेगवान गोलंदाजीत त्याने जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदीला स्थान दिले. त्यामुळे त्याच्या संघात २ दमदार फलंदाज, २ वेगवान गोलंदाज आणि १ फिरकीपटू असा चांगला समतोल साधला गेला आहे.
तो म्हणाला, ‘मी कदाचीत जोस बटलरबरोबर फलंदाजीची सुरुवात करेल. तो खूप आक्रमक आहे आणि तो वेगवान व फिरकी अशी दोन्ही गोलंदाजी चांगल्या प्रकारे खेळू शकतो. तो आयपीएलमध्ये सुरुवातीपासूनच फॉर्ममध्ये आहे आणि गेल्यावर्षी टी२० विश्वचषकातही त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याने युएईमध्ये कठीण परिस्थितीतही खरंच चांगला खेळ केला होता.’
जयवर्धनेने त्याच्या संघात स्थान दिलेल्या पाचही खेळाडूंचा सध्याचा फॉर्म लक्षात घेतला आहे. याच आधारावर त्यांना त्याने संघात स्थान दिले आहे. जयवर्धने हा सध्या मुंबई इंडियन्सबरोबर आयपीएल २०२२ मध्ये व्यस्त आहे. तो आयसीसी हॉल ऑफ फेमचा देखील सदस्य आहे. तसेच त्याने श्रीलंकेकडून तिन्ही क्रिकेट प्रकारच्या संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. आता तो प्रशिक्षण क्षेत्रात काम करताना दिसून येत आहे. त्याच्याच मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने २०१७, २०१९ आणि २०२० असे तीन वर्षे आयपीएल विजेतेपद जिंकले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
किती गोड! इंग्लंडमध्ये पुजाराला चीयर करतेय ‘खास चाहती’, क्यूट व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस
गलती से मिस्टेक! ट्रेंट बोल्टच्या पायाला लागला प्रसिद्ध कृष्णाचा तेजतर्रार थ्रो, धापकन पडला खाली
अंपायरने वाईड दिला म्हणून भडकला सॅमसन, थेट डीआरएसची केली मागणी, पाहा Video