कोका कोला कपचे २००१मध्ये झिंबाब्वे देशात आयोजन करण्यात आले होते. भारत, वेस्ट इंडिज व यजमान झिंबाब्वे असे तीन संघ या स्पर्धेत वनडे सामने खेळले. ही स्पर्धा पुढे विंडीज संघाने जिंकली. परंतु यातील पहिल्या सामन्यात एक वेगळीच गमतीशीर गोष्ट पहायला मिळाली.
वेस्ट इंडिज विरुद्ध झिंबाब्वे या सामन्याने स्पर्धेची सुरुवात झाली. यातील पहिल्याच सामन्यात झिंबाब्वेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यामुळे प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजने निर्धारित ५० षटकांत ५ बाद २६६ धावा केल्या. यात डॅरेन गंगा (६६), ख्रिस गेल (५५) व शिवनारायण चंद्रपाॅल (५१) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. विंडीजच्या ४ फलंदाजांना फलंदाजीची संधी मिळाली नाही.
२६७ धावांचे लक्ष घेऊन मैदानात आलेल्या झिंबाब्वे संघाने ५० षटकांत ९ बाद २३९ धावा केल्या. त्यांच्याकडून केवल एलेस्टर कॅंबल या खेळाडूला अर्धशतकी खेळी करता आली. विंडीजकडून रायन किंग (१), मार्वन डिल्लन (३), महेंद्र नागामुटु (१) व मार्लन सॅम्युअल (३) या गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या. Man of the Match award without a run, wicket, or catch.
परंतु यातील कॅमेराॅन कफी या गोलंदाजाने वेस्ट इंडिजकडून पहिले षटक टाकले. शिवाय त्याने १० षटकांत २० धावा देताना २ निर्धाव षटकं टाकली. बाकी गोलंदाजांनी बऱ्यापैकी धावा दिलेल्या असताना कफीने झिंबाब्वे संघाला चांगलेच जखडून ठेवले. त्याने या सामन्यात एकही धाव घेतली नाही. तसेच एकही विकेट घेतली नाही. एवढंच काय झेल देखील घेतला नाही. त्याने या सामन्यात केवळ एका खेळाडूला धावबाद केले. परंतु त्याच्या गोलंदाजीने सामन्याची दिशा बदलल्यामुळे त्याला सामनावीर घोषीत करण्यात आले.
महत्त्वाचे लेख-
–पहा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने घेतले आहे किती शिक्षण ?
–रोहितसह हे ३ फलंदाज टी२० क्रिकेटमध्ये करु शकतात द्विशतक
–क्रिकेटमधील अशा ५ बॅट्स, ज्यांच्यामुळे झाले होते मोठे वाद