मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी सोमवारी पावसामुळे एकही चेंडू फेकला गेला नाही. सध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत असून या निर्णायक सामन्यात इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर आहे. या सामन्याचा संपूर्ण निकाल आता पावसावर अवलंबून आहे. सोमवारी दिवसभर पाऊस पडल्याने इंग्लंडचा विजय लांबणीवर पडला आहे.
वेस्ट इंडीजला विजयासाठी अजून 389 धावांची गरज आहे. वेस्ट इंडीजची दुसऱ्या डावात खराब सुरुवात झाली असून 10 धावांवर दोन गडी बाद झाले आहेत. लंचपर्यंत क्रेग ब्रेथवेट दोन आणि शाई होप चार धावांवर खेळत होते.
वेस्ट इंडिजचे दोन्ही विकेट वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने घेतले. त्याने आतापर्यंत या सामन्यात आठ बळी घेतले आहेत.त्याने कसोटी कार्यकीर्दीत आतापर्यंत 499 विकेट घेतल्या आहेत. आणखी एक विकेट घेतल्यास तो 500 बळीचा टप्पा पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा दुसरा आणि जगातला सातवा गोलंदाज होईल.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मँचेस्टर येथे पाचव्या दिवशीही पाऊस येण्याची शक्यता आहे. इंग्लंडकडे ही मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. दुसरीकडे हा सामना अनिर्णित राखून मालिका बरोबरीत राखण्याचा वेस्ट इंडीजचा प्रयत्न असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–ब्रेट ली म्हणतो, हा भारतीय क्रिकेटर म्हणजे तर साक्षात रिकी पॉटींगच
–खुशखबर! क्रिकेटमधील धमाल लीग असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर
–कोरोनामुळे ४ महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये अडकलेला क्रिकेटर अखेर वेस्ट इंडिजला रवाना