भारतीय संघाचा युवा प्रतिभावान खेळाडू मनदीप सिंग आयपीएलच्या 13 व्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत आहे. चार दिवसांपूर्वी त्याच्या वडिलाचे हृदयविकराच्या धक्क्याने निधन झाले होते. आयपीएलमध्ये व्यस्त असल्याने तो वडिलांच्या अंतिम संस्काराला जाऊ शकला नव्हता. मात्र, सोमवारी (26 ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याने 66 धावांची दमदार खेळी केली. ही खेळी त्याने वडिलांना समर्पित केली आणि वडिलांच्या आठवणींना उजाळाही दिला.
पंजाबने कोलकाताविरुद्ध मिळवलेल्या विजयात सलामीवीर मनदीपचा मोठा वाटा होता. त्याने पंजाबकडून 150 धावांचा पाठलाग करताना 56 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावल्या. ही खेळी मनदीपसाठी खूपच संस्मरणीय ठरली, कारण त्याने वडिलांच्या निधनाचे दु:ख पचवत हा अतीशी डाव खेळला होता. यावेळी सामन्यादरम्यान त्याने अर्धशतक झळकवून आकाशाकडे पाहिले आणि काही दिवसांपूर्वी या जगाला निरोप देणाऱ्या वडिलांना हा डाव समर्पित केला.
वडिलांच्या निधनानंतर मनदीप भारतात परतण्याऐवजी लगेचच दुसऱ्या दिवशी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात मैदानात उतरला होता. त्या सामन्यात तो काही खास कामगिरी करू शकला नव्हता. मात्र कोलकाताविरुद्ध दमदार खेळी करून त्याने स्वतःला सिद्ध केले. वडिलांच्या निधनामुळे किती त्रास होतो हे सामन्यानंतर मनदीपला जाणवले.
You deserve it all and more @mandeeps12 😊😊#Dream11IPL pic.twitter.com/c5GRlWgU5q
— IndianPremierLeague (@IPL) October 26, 2020
वडील नेहमी नाबाद खेळी करायला सांगायचे
वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना मनदीप म्हणाला की, “माझे वडील माझ्यासाठी खूप विशेष व्यक्ती आहेत. माझ्या वडिलांनी मला नेहमीच प्रत्येक सामन्यात नाबाद खेळी खेळण्याचे सांगितले. ते मला नेहमी सांगायचे आपण 100 किंवा 200 धावा केल्या तरी आपण नाबाद खेळी खेळायची. मागील सामन्यात मी धावा करण्याचा प्रयत्न केला पण मला ते कठीण काम वाटलं. सामन्यापूर्वी मी केएल राहुलशी बोललो होतो, मी त्याला सांगितले की मी माझा सामान्य खेळ खेळल्यास आपण सामना जिंकू आणि मला याचा विश्वास होता.”
मनदीपची आयपीएल कारकीर्द
मनदीपने आयपीएलमध्ये 102 सामने खेळले आहेत. यात त्याने 22.53 च्या सरासरीने 1645 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या 77 आहे. कोलकाताविरुद्ध सोमवारी (26 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात त्याने आयपीएल कारकिर्दीतील 6 वे अर्धशतक झळकावले.
महत्त्वाच्या बातम्या –
–IPL2020 : सामन्याअगोदर वडिलांचे निधन, डोंगराएवढे दुःख पचवून ‘तो’ उतरला सलामीला
हिट-मॅन IPLमधून आऊट झाल्यास मुंबईला गंभीर तोटे; इतका महत्वाचा ठरतोय संघासाठी रोहित
रोहित शर्माची आयपीएलमधून माघार? मुंबई इंडियन्सने दिली महत्वाची माहिती…
ट्रेंडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
आयपीएलमध्ये डंका वाजलाच, आता ‘मिशन ऑस्ट्रेलिया’; ‘हा’ आर्किटेक्ट बांधणार संघाच्या विजयाचा पूल
एमएस धोनीच्या गावचा पोरगा, जो चेन्नईकडून आयपीएलमध्ये करतोय पदार्पण