---Advertisement---

काल कर्नाटकला मोठे विजेतेपद मिळवून देणारा मनिष पांडे आज अडकला विवाहबंधनात!

On: सोमवार, डिसेंबर 2, 2019 6:32 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज आणि कर्नाटकचा कर्णधार मनीष पांडे सोमवारी(2 डिसेंबर) मुंबईत दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टी बरोबर विवाहबंधनात अडकला आहे.

त्याच्या लग्नातील फोटो सनरायझर्स हैद्राबाद या आयपीएलमधील संघाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पांडे हैद्राबादकडून आयपीएलमध्ये खेळतो.

आज(2 डिसेंबर) लग्नबंधनात अडकण्यापूर्वी पांडेने काल(1 डिसेंबर) कर्नाटक संघाला त्याच्या नेतृत्वाखाली सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले आहे.

विशेष म्हणजे या स्पर्धेत काल सुरत येथे पार पडलेल्या कर्नाटक विरुद्ध तमिळनाडू संघातील अंतिम सामन्यात पांडेने 45 चेंडूत नाबाद 60 धावांची खेळी केली होती. या सामन्यात कर्नाटकने 1 धावेने विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

या सामन्यानंतर पांडेने तो आज लग्न करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

काही रिपोर्टनुसार पांडेचा हा विवाह सोहळा दोन दिवस चालणार आहे. या सोहळ्यासाठी त्याचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहतील.

या सोहळ्यानंतर लगेचच पांडेला 6 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात सामील व्हावे लागणार आहे.

पांडेची पत्नी अश्रिता ही दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे वय 26 वर्षे असून तिने आत्तापर्यंत बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यापैकी इंद्रजीत, ओरू कन्नियुम मुनू कलावानिकलूम आणि उधयम एनएच4 या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---