काही दिवसांपूर्वी विजय हजारे २०२१ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत हिमाचल प्रदेश संघाने जेतेपदावर नाव कोरले. ही स्पर्धा झाल्यानंतर लवकरच देशांतर्गत क्रिकेटमधील मोठ्या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपल्या खेळाडूंची यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे. दरम्यान बंगाल संघाने देखील २१ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये स्वतः राज्याचे क्रीडा मंत्री खेळताना दिसून येणार आहेत.
बंगाल संघाने रणजी ट्रॉफी २०२२ (Ranji trophy 2022) स्पर्धेसाठी आपल्या २१ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. या संघात माजी कर्णधार मनोज तिवारीचा देखील समावेश करण्यात आला आहे. मनोज तिवारी (Manoj Tiwary) सध्या पश्चिम बंगालच्या क्रीडामंत्र्यांची भूमिका पार पाडत आहे. मनोज तिवारीने गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसकडून शिबपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यादरम्यान त्याने भाजपच्या रतीन चक्रवर्ती यांचा ६००० हून अधिक मतांनी पराभव केला होता.
राजकारणाच्या खेळपट्टीवर उतरल्यानंतर मनोज तिवारी क्रिकेटपासून काही काळ दूर राहिला होता. आता तो पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याचे १८ वे वर्ष असणार आहे. त्याने शेवटचा सामना मार्च २०२० मध्ये सौराष्ट्र संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळला होता. त्यानंतर तो दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता.(Manoj Tiwary sports minister)
मनोज तिवारीची कारकीर्द (Manoj Tiwary stats)
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीला प्रथमश्रेणी क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्याने १२५ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ५०.३६ च्या सरासरीने ८९६५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २७ शतक आणि ३७ अर्धशतक झळकावले आहेत. यादरम्यान नाबाद ३०३ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तसेच, भारतीय संघाकडून त्याने १२ वनडे आणि ३ टी२० सामने देखील खेळले आहे. यादरम्यान त्याने वनडे क्रिकेटमध्ये १ शतक आणि १ अर्धशतक झळकावले आहे.
बंगाल संघाचा पहिला सामना त्रिपुरा संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना होण्यापूर्वी बंगाल आणि मुंबई संघ ६-७ जानेवारी रोजी सराव सामन्यासाठी आमने सामने येणार आहेत.
असा आहे बंगालचा २१ सदस्यीय खेळाडूंचा संघ : अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), मनोज तिवारी, अभिषेक दास, ऋतिक चॅटर्जी, अभिषेक रमण, सुदीर घरामी, सुदीप चॅटर्जी, अनुष्टुप मजुमदार, सायन शेखर मंडल, आकाश दीप, इशांक पोरेल, रित्विक रॉय चौधरी, शाहबाज अहमद, मुकेश कुमार, काझी जुनैद सैफी, नीलकांत दास, साकीर हबीब गांधी, प्रदिप्ता प्रामाणिक, गीत पुरी आणि करण लाल.
महत्वाच्या बातम्या :
सौराष्ट्रने गमावला माजी रणजीपटू, डीएसपी म्हणून होते कार्यरत
हे नक्की पाहा :