पुणे, दि.1 जुलै 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित पीवायसी रिअल्टी सेव्हन चेस लीग स्पर्धेत तिसऱ्या फेरीअखेर मराठा वॉरियर्स संघाने 11 गुणांसह आघाडी प्राप्त केली आहे. पीवायसी जिमखाना येथील बुद्धिबळ संकुलात आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत तिसऱ्या फेरीतपरम जालन,राजन जोशी, आदित्यवर्धन त्रिमल,इशान तळवळकर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर मराठा वॉरियर्स संघाने किंग्ज 64 संघाचा पराभव केला. किंग्ज संघ दुसऱ्या स्थानी आहे.
दुसऱ्या सामन्यात ट्रायडेंट्स संघाने विझार्ड्सला बरोबरीत रोखले व 3 गुणांची कमाई केली. ट्रायडेंट्स संघ तिसऱ्या फेरीअखेर 9.5 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. 7 नाईट्स संघाने नेव्हिगेटर्स संघाचा पराभव करून 4गुणांची कमाई केली. विजयी संघाकडून प्रियदर्शन डुंबरे, केतन देवल, रोहिन लागु, नितीन गोरे यांनी सुरेख कामगिरी केली.
स्पर्धेचे उद्घाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव सारंग लागु, सेव्हन रिअल्टीचे संचालक कपिल त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या बुद्धिबळ विभागाचे सचिव शिरीष साठे, क्लबच्या समिती सदस्य तन्मय आगाशे, अमोद प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते. (Maratha Warriors lead at the end of the third round in the PYC Realty Seven Chase League tournament)
स्पर्धेचा सविस्तर निकाल: राऊंड रॉबिन: तिसरी फेरी:
किंग्ज 64 (1.5गुण) पराभुत वि. मराठा वॉरियर्स(4.5गुण)
रोहित देवल(0गुण) पराभुत वि. परम जालन(1गुण);
आश्विन त्रिमल(0गुण) पराभुत वि. राजन जोशी(1गुण);
आदित्य भट(0.5गुण)बरोबरी वि.अर्णव कुंटे(0.5गुण);
आदित्य लाखे(1गुण) वि.वि. गौतम गोवित्रिकर(0गुण);
अभिषेक देशपांडे(0गुण) पराभुत वि.आदित्यवर्धन त्रिमल(1गुण);
निरन भुरट(0गुण) पराभुत वि. इशान तळवळकर(1गुण);
ट्रायडेंट्स(3गुण) बरोबरी वि. विझार्ड्स(3गुण)
विजय ओगळे(0गुण) पराभुत वि. अक्षय साठे(1गुण);
मकरंद दाते(0गुण) पराभुत वि. चारुदत्त साठे(1गुण);
अभिषेक गोडबोले(0गुण) पराभुत वि. शुभांकर भाजेकर(1गुण);
आकाश सुर्यवंशी(1गुण) वि.वि.मेहुल सुर्वे(0गुण)
रोनित जोशी(1गुण) वि.वि.अनिल कुलकर्णी(0गुण);
कार्तिक चिंचणकर(1गुण) वि.वि. आर्य बजाज(0गुण);
नेव्हिगेटर्स(2गुण) पराभुत वि.7 नाईट्स(4गुण)
निखिल चितळे(0गुण) पराभुत वि. प्रियदर्शन डुंबरे(1गुण);
अनिका फडके(0गुण) पराभुत वि. केतन देवल(1गुण);
पराग चोपडा(0गुण) पराभुत वि. रोहिन लागु(1गुण);
अमिर आजगावकर(1गुण) वि.वि. प्रयान गाला(0गुण);
सलील गुप्ते(1गुण) वि.वि. सायेशा खिंवसरा(0गुण);
बाळ कुलकर्णी(0गुण) पराभुत वि. नितीन गोरे(1गुण).
महत्वाच्या बातम्या –
कोट्यावधी भारतीयांची मने जिंकणारा विराट बेन स्टोक्समुळे प्रभावित, वाचा काय म्हणाला किंक कोहली
तुषार देशपांडेला मिळाली आणखी एक संधी! आता ‘या’ संघासाठी दाखवणार दम