भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी मागील दोन दिवसापासून चांगलाच चर्चेत आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपण आर्थिक तंगीशी झुंजत असल्याचे म्हटले होते. आपल्याला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरीच्या आवश्यकता असल्याचे तो म्हणत होता. ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता एका मराठी उद्योजकानेच त्याला मदतीचा हात पुढे केला आहे.
विनोद कांबळे यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटले होते,
“मी सध्या मोठ्या संकटात सापडलो आहे. माझ्या हाताशी काम नाही. मला बीसीसीआयकडून मासिक ३०,००० रुपये मिळतात त्यावरच मी उदरनिर्वाह करतोय. कृपया, मुंबई क्रिकेट असोसिएशनने मला प्रशिक्षणातील काहीतरी काम द्यावे. मला सचिन तेंडुलकरने नोकरी देऊन मदत केली होती. मात्र, आरोग्याच्या समस्येमुळे मला ती नोकरी सोडावी लागली. त्याला सर्व परिस्थिती माहीत आहे पण मी त्याला आता काहीही मागू शकत नाही. त्याने मला शक्य तितकी मदत केली आहे.”
त्याच्या या परिस्थितीमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील एक उद्योगपती संदीप थोरात यांनी त्याला मदतीचा हात देऊ केला आहे. मुंबईस्थित सह्याद्री उद्योगसमूहाच्या फायनान्स कंपनीत एक लाख रुपये पगाराच्या नोकरीची ऑफर त्यांनी कांबळीला दिली आहे. याविषयी बोलताना थोरात म्हणाले,
“महाराष्ट्रात इतके चांगले व्यक्ती असताना विनोद कांबळीसारख्या व्यक्तीवर अशी वेळ येणे दुर्दैवी आहे. त्याने क्रिकेटच्या माध्यमातून देशाचे नाव मोठे केले होते. मात्र, आज उदरनिर्वाहासाठी त्याला अशी याचना करावी लागते हे आपले अपयश आहे.”
कांबळी २०१९ मध्ये मुंबई टी२० लीगमध्ये अखेरच्या वेळी प्रशिक्षक म्हणून दिसला होता. त्यानंतर त्याने सचिन तेंडुलकरच्या मिडलसेक्स क्रिकेट क्लबमध्ये प्रशिक्षक म्हणून काही काळ काम केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटचा ‘राजा बाबू’! एका पायावर मारले तब्बल ७० षटकार; आता सरकारकडून आहे अपेक्षा
‘संजू बाबा’चा विषये का! एकदा चेंडू हातून निसटूनही पूर्ण केला झेल, पाहा कौतुकास्पद कॅच
थेट हृदयावर वार! राष्ट्रगीतापूर्वी कर्णधार राहुलने असे काही करत ठेवला देशभक्तीचा आदर्श