इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी (१४ ऑगस्ट) इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने एकहाती झुंज देत नाबाद १८० धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाने ३९१ धावांचा डोंगर उभारत २७ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसर्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले होते.
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल याने पहिल्या डावात फलंदाजी करताना १२९ धावांची शानदार खेळी केली होती. त्यामुळे, दुसऱ्या डावात देखील तो भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देईल अशी आशा व्यक्त केली जात होती. परंतु, तो दुसऱ्या डावात मोठी खेळी करू शकला नाही. दुसऱ्या डावात तो अवघ्या ५ धावा करत माघारी परतला.
या सामन्यातील पहिल्या डावात केएल राहुल आणि रोहित शर्मा या दोघांनी मिळून शतकी भागीदारी करत चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु, दुसऱ्या डावातील ९ व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर मार्क वूडने राहुलला माघारी धाडले. मार्क वूडने अप्रतिम चेंडू टाकला, ज्यावर केएल राहुलने रक्षात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा प्रयत्न फसला आणि चेंडू बॅटचा कड घेत यष्टिरक्षक जोस बटलरच्या हातात गेला.(Mark wood sent back kl rahul to the pavelian,watch video)
WOODYYYY! COME ON!!
Scorecard/Clips: https://t.co/GW3VJ3wfDv
🏴 #ENGvIND 🇮🇳 | #RedForRuth pic.twitter.com/vS2HktUVfb
— England Cricket (@englandcricket) August 15, 2021
भारताकडे १५४ धावांची आघाडी
दुसऱ्या डावात भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुल(५) आणि रोहित शर्मा(२१) लवकर माघारी परतले होते. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, विराट लवकर बाद झाला. पण असे असले तरी पुजारा आणि अजिंक्य रहाणेने १०० धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला.
पण चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात दोघेही बाद झाले. पुजारा ४५ धावा करुन, तर रहाणे ६१ धावा करुन बाद झाला. दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात ८२ षटकात ६ बाद १८१ धावा केल्या आहेत. तसेच १५४ धावांची आघाडी घेतली आहे. रिषभ पंत १४ धावांवर आणि इशांत शर्मा ४ धावांवर नाबाद आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बॅडलक!! पहिल्या डावातील शतकवीर केएल राहुल,दुसऱ्या डावात असा झाला बाद
अर्धशतक झळकावले नसताना देखील कर्णधार कोहलीने केली २१ वर्षांपूर्वीच्या अझरुद्दीनच्या विक्रमाची बरोबरी