काही दिवसांपुर्वी वेस्ट इंडिजचा फलंदाज मर्लोन सॅम्युएल्स चर्चेत आला होता. त्याने इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याच्या पत्नीवर अश्लील टीका केली होती. त्यामुळे महान फिरकीपटू शेन वॉर्न आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉ यांनी सॅम्युएल्सवर निशाणा साधला होता. आता याच सॅम्युएल्सने क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती घोषित केली आहे.
वादांनी भरली होती क्रिकेट कारकिर्द
२०१२ आणि २०१६ सालच्या टी२० विश्वचषकात या ३९ वर्षीय सलामीवीर फलंदाजाने मोलाची कामगिरी केली होती. या दोन्ही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सॅम्युएल्सने सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि सामनावीर पुरस्कारही मिळवला होता. २०१२मध्ये श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज संघात टी२० विश्वचषकाची अंतिम लढत झाली होती. या लढतीत सॅम्युएल्सने ५६ चेंडूत सर्वाधिक ७८ धावा केल्या होत्या. तर २०१६मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने ६६ चेंडूत नाबाद ८५ धावा लगावल्या होत्या.
मात्र विश्वचषक पटकावल्यानंतर सॅम्युल्सने टेबलवर पाय ठेवून मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्याच सापडला होता. तसे तर, सॅम्युएल्सची क्रिकेट कारकिर्द वादांनी भरलेली राहिली आहे. २००८ साली तो बेकायदेशीरणे पैसे घेताना आणि क्रिकेटला बदनाम करताना दोषी आढळला होता. त्यामुळे आयसीसीने त्याच्यावर २ वर्षांची बंदी घातली होती. एवढेच नाही तर, २००२ साली भारतातील संचारबंदीवर टीका केल्यामुळे घरी परत पाठवण्यात आले होते.
मर्लोन सॅम्युएल्सची क्रिकेटमधील आकडेवारी
सॅम्युअल्सने २००० साली श्रीलंकाविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. त्यानंतर त्याने एकूण २०७ वनडे सामने खेळले. ज्यात त्याने ३२.९७च्या सरासरीने ५६०६ धावा केल्या होत्या. तर ७१ कसोटी सामन्यात ३२.६४च्या सरासरीने ३९१७ धावा जडल्या होत्या. तर टी२० क्रिकेटमध्येही त्याने ६७ सामन्यात १६११ धावांची कामगिरी केली होती.
याव्यतिरिक्त सॅम्युएल्सने आयपीएलच्या पुणे वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्त्व केले होते. २०१२-१७ दरम्यान त्याने एकूण १५ आयपीएल सामने खेळले होते. ज्यात १६१ धावा आणि ९ विकेट्सची खात्यात नोंद केली होती.
तसेच देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची आकडेवारीही उल्लेखनीय राहिली आहे. त्याने १२२ प्रथम श्रेणी सामन्यात ७२९५ धावा लगावल्या आहेत. तर २७५ अ दर्जाच्या क्रिकेट सामन्यात ७६५२ धावा आणि १८७ देशांतर्गत टी२० सामन्यात ४५८७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितच्या खांद्याला खांदा लावून गेली ११ वर्षे ‘तो’ मुंबईसाठी धावांचा रतीब घालतोय
आयपीएल २०२०: साखळी सामन्यांनंतर अशी आहे ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठीची स्पर्धाची
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०: प्रतिभा असूनही ‘हे’ पाच खेळाडू राहिले वंचित, नाही मिळाली संधी
वनडेत १७४ चेंडूत नाबाद ३६ धावा करणाऱ्या गावसकरांनी एकदा सेहवाग स्टाईल केली होती गोलंदाजांची धुलाई
आर्थिक तंगीमुळे एकेवेळी प्लंबिंग व्हॅन चालणारा क्रिकेटर पुढे वेगाचा बादशाह झाला…






