---Advertisement---

तो खेळाडू ९ वर्षापूर्वी करत होता हे काम, आता ऍशेसमध्ये पदार्पण करण्यासाठी आहे सज्ज

On: मंगळवार, जुलै 30, 2019 7:52 PM
---Advertisement---

1 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 71व्या ऍशेस मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लॅब्यूशानेचाही समावेश आहे. त्यामुळे जर त्याला खेळण्याची संधी मिळाली तर तो पहिल्यांदाच ऍशेस मालिकेतील सामन्यात खेळेल.

विशेष म्हणजे 9 वर्षापूर्वी म्हणजेच 2010च्या ऍशेस मालिकेत मार्नस हॉट स्पॉट कॅमेरा सांभाळत होता. मार्नसने सोमवारी याबद्दलची एक आठवण सांगितली आहे.

सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार मार्नस म्हणाला, ‘ऍशेसची माझ्यासाठी खास आठवण अशी आहे की मी चॅनेल 9 साठी हॉट स्पॉट बॉय म्हणून काम करत होतो. जेव्हा 2010 च्या ऍशेस मालिकेत पीटर सिडसने हॅट्रिक घेतली होती तेव्हा मी हॉट स्पॉट कॅमेरा सांभाळत होतो.’

‘मी दुसऱ्या मजल्यावर त्या सामन्यात हॉट स्पॉट कॅमेरा सांभाळण्याचे काम करत होतो. जेव्हा ती हॅट्रिक घेतली गेली तेव्हा मी तिथे होतो, हे खूप शानदार आहे.’

तो पुढे म्हणाला, ‘मला सामना पाहण्यासाठी पैसे मिळत होते, त्यामुळे माझ्यासाठी तेव्हा तो एक विजय होता. मला कॅमेरा सांभाळण्यासाठी दिवसाला 90 डॉलर मिळत होते.’

याबरोबरच मार्नसला विविध क्रिकेट बॅट्सविषयी खूप आकर्षण आहे. याबद्दल तो म्हणाला, ‘मला बॅट्स आवडतात. मला त्याचे गिअर आवडतात, मला बॅट्सविषयी बोलायला आवडते, त्याच्यातील बदल, हँडेलचे आकार, बॅटला टेप कसे करावे, बॅटची रुंदी.’

25 वर्षीय मार्नसला या ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची संधी मिळू शकते. त्याने याआधी 5 कसोटी सामने खेळले असून यात 210 धावा केल्या आहेत. तसेच 9 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 2018 मध्ये पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून कसोटीमध्ये पदार्पण केले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

पहा व्हिडीओ- तेव्हा कपिलने ४ चेंडूत ४ षटकार ठोकून फॉलो-ऑन वाचवला होता!

वाढदिवस विशेष- बर्थडे बाॅय जेम्स अँडरसनबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

…म्हणून विराट कोहलीने मागितली पत्रकारांची माफी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment