एआयबीए जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. तिने युक्रेनच्या ह्वाना ओखोटाला पराभूत केले.
४८ किलो वजनी गटात ही कामगिरी केली. ह्वाना ओखोटाला तीने ५-०ने पराभूत केले
तिने गुरुवारी उत्तर कोरियाच्या की किम ह्यांगला पराभूत केले होते.
यापुर्वी मेरी कोमने जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धेत ६ पदके मिळवली असून हे तिचे ७वे पदक आहे. मेरीने या स्पर्धेत आजपर्यंत ६ सुवर्ण आणि १ रौप्यपदक पटकावले आहे. तिने २०१०मध्ये ४८ किलो वजनी गटात शेवटचे सुवर्णपदक पटकावले होते.
या स्पर्धेतील पदकापुर्वी ती आयरीश बाॅक्सर कॅटी टेलरसह सर्वाधिक पदके मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी होती. आता मात्र मेरीने तिला मागे टाकले आहे.
या स्पर्धेतील ती सर्वात यशस्वी महिला बाॅक्सर ठरली आङे. २००२, २००५, २००६, २००८, २०१० मध्ये तीने या स्पर्धेत पदक जिंकले होते. २००१मध्ये तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.