वेलिंग्टन।न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात बेसिन रिझर्व स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने आज(24 फेब्रुवारी) 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. तसेच 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हा न्यूझीलंडचा 100 वा कसोटी विजय ठरला आहे. पण असे असले तरी त्यांच्या नावावर मात्र एक नकोसा विक्रम झाला आहे.
न्यूझीलंडने 441 वा कसोटी सामना खेळताना हा 100 वा विजय मिळवला आहे. त्यामुळे सर्वात जास्त सामने खेळल्यानंतर 100 व्या विजयाची नोंद करण्याचा नकोसा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर झाला आहे. याआधी हा विक्रम भारताच्या नावावर होता. भारताने 2009 मध्ये 100 वा कसोटी विजय मिळवला होता. त्यासाठी भारताला 432 सामने खेळावे लागले होते.
न्यूझीलंडच्या आधी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि भारत या संघांनी 100 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामन्यात विजय मिळवले आहेत.
यापैकी ऑस्ट्रेलियाने सर्वात कमी सामने खेळताना 100 वा कसोटी विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने 1951 मध्ये 199 वा सामना खेळताना 100 कसोटी विजयांची नोंद केली होती. त्यांच्या पाठोपाठ इंग्लंड असून त्यांनी 1939 मध्ये 241 व्या कसोटी सामन्यात 100 वा विजय मिळवला होता.
सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये 100 वा विजय मिळवणारे संघ –
199 सामने – ऑस्ट्रेलिया (1951)
241 सामने – इंग्लंड (1939)
266 सामने – वेस्ट इंडिज (1988)
310 सामने – दक्षिण आफ्रिका (2006)
320 सामने – पाकिस्तान (2006)
432 सामने – भारत (2009)
441 सामने – न्यूझीलंड (2020)
…म्हणून पहिल्या कसोटीत १०० हा आकडा न्यूझीलंडसाठी ठरला महत्त्वाचा
वाचा👉https://t.co/GqxeVx0bGQ👈#म #मराठी #cricket #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 24, 2020
आठवतंय का? आजच्याच दिवशी ३६ वर्षांच्या सचिन तेंडूलकरने क्रिकेटमध्ये घडवला होता इतिहास
वाचा👉https://t.co/6x8JsvAYDh👈#म #मराठी #cricket #SachinTendulkar #OnThisDay #DoubleCentury @sachin_rt— Maha Sports (@Maha_Sports) February 24, 2020