भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा कसोटी सामना इंदोर येथे बुधवारपासून (दि. 1 मार्च) खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाची दाणादाण उडवली आहे. पहिल्या दोन कसोटीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला होता, तो तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने कमी करून टाकला. भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 109 धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या दहापैकी पाच विकेट्स ऑस्ट्रेलियाच्या एकट्या फिरकीपटूने काढून खास विक्रम नावावर केला.
मॅथ्यू कुह्नेमनच्या विकेट्स
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. यावेळी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्व विकेट्स अवघ्या 33.2 षटकात गमावत 109 धावांवर गुडघे टेकले. यातील 5 विकेट्स मॅथ्यू कुह्नेमन (Matthew Kuhnemann) याने घेतल्या. त्याने भारतीय संघाचे सलामीवीर रोहित आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांना चालते केले. आधी 12 धावांवर खेळत असलेल्या रोहितला 5.6 षटकात 27 धावांवर बाद केले. त्यानंतर 21 धावांवर खेळणाऱ्या शुबमनला 7.2 षटकात 34 धावांवर बाद केले.
यानंतर त्याने 11.2 षटकात श्रेयस अय्यर याला शून्यावर तंबूत धाडले. यावेळी संघाची धावसंख्या 45/5 इतकी होती. त्यानंतर चौथ्या विकेटच्या रूपात त्याने आर अश्विन याला 28.3 षटकात 88 धावांवर बाद केले. तसेच, पाचवी विकेट त्याला 2 षटकार मारत 17 धावा करणाऱ्या उमेश यादवची मिळाली. उमेशला त्याने 32.2 षटकात 108 धावसंख्येवर बाद केले. तसेच, विकेट्सचे पंचक पूर्ण केले.
Career-best first-class figures for Matthew Kuhnemann! 👏#INDvAUS pic.twitter.com/lmC6KTgOFD
— cricket.com.au (@cricketcomau) March 1, 2023
मॅथ्यू कुह्नेमनचा पराक्रम
मॅथ्यूने या पाच विकेट्स 9 षटके गोलंदाजी करताना अवघ्या 16 धावा खर्च करत नावावर केल्या. अशाप्रकारे तो भारतात सर्वात कमी धावा खर्च करत विकेट्सचे पंचक पूर्ण करणारा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला. त्याच्यापूर्वी मायकल क्लार्क (Michael Clarke) याने 2004मध्ये भारताविरुद्ध खेळताना 9 धावा खर्च करत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
दुसऱ्या कसोटीतून केले पदार्पण
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील दुसऱ्या कसोटीतून मॅथ्यू कुह्नेमन याने पदार्पण केले होते. त्याने पहिल्याच कसोटीत 2 विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला होता. अशात त्याने दुसऱ्या कसोटीत त्याने भारतीय संघाची दाणादाण उडवली. (Matthew Kuhnemann has Australia’s second cheapest five-fer in India after Michael Clarke)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लायनचा नाद सोड बाबा! ‘या’ भारतीय धुरंधराला तब्बल 12 वेळा गमवावी लागलीय विकेट, कोण आहे तो कमनशिबी?
प्लेइंग इलेव्हनमधून केएल राहुल अखेर बाहेर, संघ व्यवस्थापनाला का घ्यावा लागला निर्णय?