---Advertisement---

८६ वर्षांत कोणत्याही भारतीयला न जमलेली गोष्ट मयांक अगरवालने पदार्पणातच केली

---Advertisement---

मेलबर्न। आजपासून(26 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

मयंकने त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील पहिल्याच डावात अर्धशतक करताना खास विक्रम केला आहे. त्याने भारताच्या पहिल्या डावात 161 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 76 धावा केल्या आहेत.

त्यामुळे तो ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. आत्तापर्यंत 86 वर्षांच्या भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियामध्ये 19 भारतीय खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले आहे.

यातील चार फलंदाजांनीच पदार्पणाच्या सामन्यात 50 किंवा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये सईद अबीद अली, हृषीकेश कानेटकर, दत्तू फडकर आणि मयंक अगरवाल यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे यातील फक्त अगरवाल आणि दत्तू फडकर यांनी ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील एका डावात अर्धशतकी खेळी केली आहे.

मयंकला या सामन्यात पॅट कमिन्सने बाद केले. त्याने या डावात सुरुवातीला हनुमा विहारी बरोबर 40 धावांची सलामी भागीदारी केली होती. पण विहारी 8 धावांवर असताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मयंकने चेतेश्वर पुजाराबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 83 धावांची अर्धशतकी भागीदारी केली.

या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 89 षटकात 2 बाद 215 धावा केल्या आहेत. भारताकडून चेतेश्वर पुजारा 68 धावांवर आणि विराट कोहली 47 धावांवर नाबाद आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू – 

76 धावा – मयंक अगरवाल

66 धावा – सईद अबीद अली

56 धावा – हृषीकेश कानेटकर

53 धावा – दत्तू फडकर

33 धावा – जवागल श्रीनाथ

महत्त्वाच्या बातम्या:

जेव्हा खेळाडू नाही तर प्रेक्षकच करतात कसोटी सामन्यात विक्रम

मयंक अगरवाल असा पराक्रम करणारा केवळ पाचवा भारतीय सलामीवीर फलंदाज

पदार्पणाच्या सामन्यात शानदार अर्धशतक करणाऱ्या मयंक अगरवालने केला हा खास विक्रम

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment