कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशामध्ये फिरण्यासाठी एखाद्या सुंदर ठिकाणी जाणे तर सोडाच, कोणीही आपल्या घरातून बाहेर जाऊ शकत नाही. क्रिकेट सामन्यादरम्यान अधिक वेळ प्रवासामध्ये घालवणारे खेळाडूदेखील आपापल्या घरात बसले आहेत.
अशामध्ये भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने (Mayank Agarwal) चाहत्यांना लॉकडाऊनमध्ये (Lockdown) जगभराचा प्रवास करण्याच्या ३ पद्धती सांगितल्या आहेत. त्याने ही पद्धत सोशल मीडियावर शेअर केली आहे.
मयंकने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून २ फोटो शेअर करत त्या ३ पद्धतींची माहिती दिली आहे. त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “पहिली पद्धत म्हणजे, १ खुर्ची घ्या. दुसरी पद्धत म्हणजे, दूरपर्यंत पहा आणि शेवटची तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही कल्पना करा.”
How to travel during the lock down
Step 1: Get an armchair
Step 2: Look into the horizon
Step 3: Let your imagination run wild#ArmchairTravel #QuarantineTravelChallenge #StayHome pic.twitter.com/1enXb5DNLp— Mayank Agarwal (@mayankcricket) May 13, 2020
यातील पहिल्या फोटोत मयंक एका बागेत खुर्चीवर बसलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत तो बीचवर (Beach) विश्रांती घेताना दिसत आहे. कल्पना करून लोक जगभरात कोठेही फिरू शकतात. अशाच प्रकारे मयंकही कल्पनेच्या माध्यमातून जगभराचा प्रवास करत आहे. याबरोबरच त्याने म्हटले की, हा आर्मचेअर ट्रॅव्हेल आहे आणि क्वारंटाईन ट्रॅव्हेल चॅलेंज आहे. मयंकने सर्वांना आपापल्या घरात राहण्याचे आवाहन केले आहे.
त्याने डिसेंबर २०१८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने उत्कृष्ट कामगिरी केला होती. मयंकने पहिल्या २ डावांमध्ये अनुक्रमे ७६ आणि ४२ धावा केल्या होत्या.
तो सध्या भारतीय कसोटी संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. मागील वर्षी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात प्रत्येकी १ द्विशतक केले होते.
मयंकने आतापर्यंत ११ कसोटी आणि ३ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ५७.२९ च्या सरासरीने ९७४ धावा केल्या आहेत. ११ कसोटी सामन्यात त्याच्या नावावर ३ शतके आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. तर वनडेत त्याने केवळ ३६ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवलेल्या खेळाडूंची ड्रीम ११
-सर्वाधिक वेळा पार्टनरला धावबाद करत तंबूचा रस्ता धरायला लावणारे फलंदाज
-तुम्हाला सांगू शकत नाही अशा गोष्टी आम्हाला विराट बोलायचा