भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल याला सराव करत असताना दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. मयंक अगरवाल संघांबाहेर गेल्याने केएल राहुलला संघात पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते. इतकेच नव्हे तर तो रोहित शर्मासह डावाची सुरुवात करताना देखील दिसून येऊ शकतो.
पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ जोरदार सराव करताना दिसून येत आहे. अशातच सराव सत्र सुरू असताना मोहम्मद सिराजने टाकलेला एक चेंडू मयंक अगरवालच्या डोक्याला जाऊन लागला होता. यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली असून तो पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा भारताकडून सलामी फलंदाजी कोण करणार? असा प्रश्न कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापकांसमोर उपस्थित झाला आहे.
केएल राहुलने सराव सामन्यात तुफानी शतक झळकावले होते. त्यांनतर तो संघात खेळणार हे तर निश्चित झाले होते. परंतु संघ व्यवस्थापकांनी स्पष्ट केले होते की, तो सलामी फलंदाज म्हणून नव्हे तर मध्यक्रमातील फलंदाज म्हणून खेळणार. परंतु आता मयंक आणि सलामीवीर शुबमन गिल संघाबाहेर झाल्यानंतर त्यांना या निर्णयात बदल करावा लागू शकतो. कारण या संघात सलामी फलंदाज म्हणून काही मोजकेच पर्याय आहे.
हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजाराचा पर्याय संघाकडे उपलब्ध आहे. परंतु त्याला सलामीला फलंदाजीचा जास्त अनुभव नाही. तसेच दुसरा फलंदाज म्हणजे अभिमन्यु ईश्वरन. बॅकअप फलंदाज म्हणून निवड झालेल्या अभिमन्यु ईश्वरनने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापक त्याला इतक्या मोठ्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी देणार नाही. अशात केएल राहुल हा एकमेव पर्याय संघापुढे शिल्लक राहिला आहे.(Mayank Agarwal injury opens the door for Kl Rahul to open the innings against England in first test)
काय आहे आशिष नेहरा आणि वीवीएस लक्ष्मण यांचे मत?
केएल राहुलला सलामीला खेळवण्याबाबत आशिष नेहराने म्हटले की, “मला माहित आहे की, संघ व्यवस्थापक केएल राहुलकडे मध्यक्रमातील फलंदाज म्हणून पाहत आहेत. परंतु तुमचे हात बांधले गेले असतील तर केएल राहुलला संधी देणे योग्य असेल. हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारा हे सलामी फलंदाज नाही. त्यामुळे त्यांना सलामीला पाठवणे हे समस्येचे निवारण नसेल.” तसेच वीवीएस लक्ष्मण यांचे देखील हेच मत आहे की, केएल राहुलने रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करावी.
महत्त्वाच्या बातम्या-
काश्मीर प्रीमियर लीग रद्द होण्यासाठी बीसीसीआयचे सर्वतोपरी प्रयत्न! आयसीसीला लिहिले पत्र
पत्नी अनुष्कासाठी विराट बनला फोटोग्राफर, तिनेही किल्लर स्माईल देत कोहलीला केले घायाळ
टीम इंडियाने ३ वर्षांपुर्वी खेळला होता नॉटिंघममध्ये शेवटचा सामना, ‘असा’ लागला होता निकाल