इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 18वा हंगाम (22 मार्च) पासून सुरू होणार आहे. पण आयपीएल सुरू होण्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सला (Lucknow Super Giants) मोठा धक्का बसला आहे. संघाचा युवा गोलंदाज मयंक यादव (Mayank Yadav) त्याच्या दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही, तो आयपीएल 2025च्या पहिल्या सत्रातून बाहेर पडेल असे मानले जात आहे.
मयंक यादवने त्याच्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे, तो मोठ्या फलंदाजांना आपल्या वेगाने चितपट करताना दिसला. यामुळेच लखनऊने त्याला लिलावापूर्वी 11 कोटी रुपयांना कायम ठेवले. शेवटच्या हंगामात लखनऊने त्याला 20 लाख रुपयांना खरेदी केले होते.
2024च्या ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पणानंतर मयंक यादवला दुखापत झाली होती. मयंकला पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती, ज्यातून तो आता सावरत आहे. चांगली गोष्ट म्हणजे त्याने अलिकडेच बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुन्हा गोलंदाजी सुरू केली आहे.
ईएसपीएनच्या अहवालानुसार, बीसीसीआयने मयंक यादवच्या पुनरागमनाची कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. जर मयंकने तंदुरुस्तीचे निकष पूर्ण केले आणि त्याचा कामाचा ताण वाढवला, तर तो आयपीएल 2025च्या दुसऱ्या सत्रात खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
मयंक यादवने आयपीएल शेवटच्या आयपीएल हंगामात 4 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 7 विकेट्स घेतल्या. दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट सुमारे 6.99 होता. गेल्या वर्षी तो त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत राहिला. त्याने आरसीबीविरुद्ध आयपीएल 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू (156.7) टाकला.
महत्त्वाच्या बातम्या-
Champions Trophy: विजयानंतर मायदेशी परतला रोहित शर्मा, चाहत्यांनी केलं जंगी स्वागत!
रोहित शर्मानं मोडला एमएस धोनीचा रेकाॅर्ड, हिटमॅनच नाव सुवर्ण अक्षरात
पीसीबी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर आयसीसीची स्पष्टता; पाकिस्तानला फटकारले






