आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचे थाटात आगमन झाले आहे. आता संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाकडे लागल्या आहेत. या लिलावानंतर सर्व संघ पूर्णपणे बदलतील आणि प्रत्येक संघात अनेक नवीन खेळाडू दिसतील. यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि फलंदाज श्रेयस अय्यर कोणत्या संघात जाईल, याकडे प्रत्येक क्रिकेट चाहत्याचे लक्ष असेल. त्याच वेळी, असेही काही संघ आहेत जे त्याला त्यांचा नवा कर्णधार बनवू शकतात.
दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर पुढील हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघ सोडून या मेगा लिलावात आपले नाव देणार असल्याच्या बऱ्याच चर्चा आहेत. त्यामुळे कदाचीत अय्यरला एका नव्या संघामध्ये पाहता येऊ शकते. विशेषत: अनेक संघांना त्याला आपला कर्णधार बनवायला देखील आवडेल. या यादीत पहिले नाव रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या संघाचे आहे.
खरं तर, विराट कोहलीने या संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने आरसीबीला पुढील वर्षी नवीन कर्णधाराची गरज भासणार आहे. अय्यर हा या संघासाठी योग्य असेल कारण तो युवा खेळाडू आहे आणि त्याला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचाही चांगला अनुभव आहे.
आरसीबी व्यतिरिक्त आयपीएलमध्ये नुकतेच दाखल झालेले नवीन संघ लखनऊ आणि अहमदाबाद हे संघही श्रेयस अय्यरचा आपल्या संघात समावेश करण्याचा प्रयत्न करतील. लखनऊ आणि अहमदाबाद आयपीएलच्या येत्या मोसमात खेळणार आहेत. या दोन्ही संघांना २०२२ च्या हंगामात दमदार कामगिरी करण्यासाठी काही चांगल्या खेळाडूंची आवश्यकता असेल आणि अय्यर त्यांच्या संघासाठी चांगला कर्णधार ठरू शकतो.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला खूप यश मिळाले आहे. २०२० वगळता दिल्लीचा संघ कधीही आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचलेला नाही. त्यावेळी संघाला अंतिम फेरीपर्यंत नेणारा कर्णधार हा श्रेयस अय्यर होता. २०२१ च्या सुरुवातीला अय्यरला दुखापत झाली आणि त्याला दिल्लीच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले. फक्त श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालीच दिल्ली संघ आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचू शकला आहे.
दिल्ली कॅपिटल्सने २०२१ च्या हंगामासाठी रिषभ पंतची कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. कारण आयपीएल सुरू होण्यापूर्वी श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर पडला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआय आली ऍक्शनमध्ये! टी२० सह वनडे संघाचा कर्णधार होणार रोहित?
शमी आणि चक्रवर्तीची होणार सुट्टी? अफगानिस्तानविरुद्ध ‘या’ २ भारतीय गोलंदाजांची होऊ शकते एन्ट्री
अफगानिस्तान संघाचे अस्त्र आहेत ‘हे’ २ गोलंदाज, टीम इंडियाही तगड्या ‘मास्टरप्लॅन’सह घेणार समाचार!