रशिया। फिफा विश्वचषकात रविवारी (17 जून) झालेल्या मेक्सिको विरूद्ध जर्मनी सामन्यात केलेल्या एका गोलमुळे मेक्सिकोमध्ये भूकंप आला. झाले असे की, या सामन्यात मेक्सिकोने गतविजेता आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या जर्मनीला 1-0 ने पराभूत केले.
हिरवींग लोझॅनो (Hirving Lozano) याने केलेल्या या विजयी गोलमुळे मेक्सिको शहरवासीयांनी उड्या मारून जल्लोष साजरा केला. यामुळे हा भूंकप आला असे तेथिल भूगर्भ विज्ञान आणि वातावरणीय अन्वेषण विभागाने सांगितले. त्यांनी याला कृत्रिम भूंकप असेही म्हटले आहे.
हिरवींगने 35व्या मिनीटाला हा गोल केला होता. त्याने केलेल्या गोलनंतर अवघ्या सात सेंकदांनी हा भुकंपाचा धक्का जाणवला. 22वर्षीय हिरवींगचा हा पहिलाच विश्वचषक आहे.
तसेच मेक्सिकन गोलकिपर गिलर्मो ओकोआने केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे त्याचे सगळीकडे कौतुक होत आहे.
“हि आश्चर्याची गोष्ट आहे”,असे एका स्थानिक टॅक्सी ड्रायव्हरने सांगितले.
“लोकांच्या या जल्लोषाने मला हा सामना पाहण्याची खूप इच्छा झाली. आधी वाटले होते की जर्मनी आपल्याला चांगलीच हरवेल मात्र झाले उलटेच”,असेही त्यांनी पुढे सांगितले.
मेक्सिकोने दोनदा विश्वचषकाचे यजमानपद भुषविले आहे. तर ही त्यांची विश्वचषकात सहभागी होण्याची 15वी वेळ आहे
जर्मनी आणि मेक्सिको 12वेळा समोरा-समोर आले असून 5 सामने जर्मनी आणि 2 सामने मेक्सिकोने जिंकले आहेत. काल जिंकलेला सामना हा त्यांचा दुसराच विजय आहे.
फिफा क्रमवारीत मेक्सिको सध्या 15व्या स्थानावर आहे.
मेक्सिकोचा पुढील सामना शनिवारी (23जून) दक्षिण कोरिया विरूद्ध आहे.
El #sismo detectado en la Ciudad de México se originó de manera artificial. Posiblemente por saltos masivos durante el Gol de la selección de #México en el mundial. Por lo menos dos sensores dentro de la Ciudad lo detectaron a las 11:32. pic.twitter.com/mACKesab3b
— IIGEA A.C. (@IIGEAac) June 17, 2018
महत्वाच्या बातम्या-
–फिफा विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत त्याने चक्क नाकारली ‘मॅन आॅफ द मॅच’
–स्मिथ-वार्नरपाठोपाठ आणखी एक मोठा क्रिकेटपटू बॉल टॅम्परींगच्या जाळ्यात