मुंबई । कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे भारतीय क्रिकेटमधील ब्रेक आज संपुष्टात येणार आहे. 6 महिन्यांनतर आज संध्याकाळी क्रिकेटला सुरुवात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे संघ आमनेसामने असतील. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून भारतीय चाहते पुन्हा एकदा क्रिकेटचा आनंद घेतील. मुंबई गतविजेता आहे, पण गेल्या सात हंगामातील त्यांचा पहिल्या सामन्यातील रेकॉर्ड धक्कादायक आहे.
सर्व संघ आयपीएलच्या 13 व्या हंगामात नवीन मार्गाने प्रारंभ करू इच्छित आहेत. शेवटच्या सात स्पर्धांचे निकाल बदलण्याच्या उद्देशाने आज मुंबईचा संघ मैदानावर उतरणार आहे. 2012 पासून, मुंबई संघाने त्यांच्या स्पर्धेतील प्रत्येक पहिला सामना गमावला आहे, तर चेन्नईने शेवटच्या तीन सामन्यात विजयासह सुरुवात केली आहे.
2011 मध्ये मुंबई संघाने आपला शेवटचा पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर गेल्या सात हंगामात संघाचा पराभव झाला. मागील हंगामात मुंबई संघाचा दिल्ली कॅपिटल्सने तिसर्या सामन्यात 37 धावांनी पराभव केला होता. दिल्लीने 213 धावा केल्या होत्या, तर मुंबईला 176 धावाच करता आल्या होत्या.
चेन्नईने 2017 पासून तीन हंगामाची सुरुवात विजयासह केली आहे. मागील हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नईने दणदणीत विजय मिळविला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाला अवघ्या 70 धावांवर बाद केले आणि नंतर 3 गडी गमावून सामना जिंकला होता.
स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मुंबई व चेन्नईचा विक्रम
चेन्नई संघाने आतापर्यंत खेळलेल्या 10 हंगामात पहिल्या सामन्यात 5 वेळा विजय मिळवला आहे. यापैकी, संघाने गेल्या तीन हंगामात प्रत्येक पहिल्या सामन्यात विजयासह सुरुवात केली आहे. मुंबईबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी 12 हंगामात पहिल्या सामन्यात केवळ 4 वेळा विजय मिळविला आहे. गेल्या सात हंगामात मुंबईने पराभवाने सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-चक्क २० संघांकडून खेळलेला अष्टपैलू आज उतरणार चेन्नई सुपर किंग्सकडून मैदानात
-सीएसके विरुद्ध मुंबई ड्रीम ११: पहा टीममध्ये कोणाला मिळाली जागा
-काय सांगता! आजपर्यंत आयपीएलमध्ये विराट कोहलीला ‘हा’ गोलंदाज एकदाही करु शकला नाही बाद
ट्रेंडिंग लेख-
-मुंबई इंडियन्सच्या फिरकी आक्रमणाचा नवा स्तंभ
-युवराजशी फ्लिंटॉफने पंगा घेतला, पण ब्रॉडने किंमत चुकवली
-आयपीएलमधील आजपर्यंतचे ए टू झेड विक्रम वाचा एका क्लिकवर