इंडिनय प्रीमियर लीग 2023चा क्वॉलिफायर दोन सामना शुक्रवारी (26 मे) खेळला जात आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघ या सामन्यात आमने सामने आहेत. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या दृष्टीने दोन्ही संघ या सामन्यात पूर्ण प्रयत्न करतील. उभय संघांतील हा सामना 7.30 वाजता सुरू होणे अपेक्षित होते. मात्र ऐन वेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे सामन्याला अर्धा तास उशीर झाला.
गुजरात टायटन्स साखळी फेरी संपल्यानंतर गुणतालिकेत पहिल्या स्थानी होती. पण क्वॉलिफायर एकमध्ये त्यांना चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला. सीएसकेने गुजरातला पराभूत करून अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. तर दुसरीकडे अंतिम सामन्यासाठी गुजरातला मात्र क्वॉलिफायर दोन जिंकवी लागणार आहे. असे असले तरी, क्वॉलिफायर दोनमध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत करणे गुजरातसाटी सोपे नसेल. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे खेळपट्टीवर गोलंदाजांचे प्रदर्शन देखील महत्वाचे ठरणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
गुजरात टायटन्स : शुभमन गिल, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), साई सुधारसन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा.
इम्पॅक्ट प्लेअर : जोश लिट्टे, शिवम मावी, ओडियन स्मिथ, साई किशोर, केएस भरत.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.
इम्पॅक्ट प्लेअर : नेहल वढेरा, रमणदीप सिंग, राघव गोयल, विष्णू विनोद, संदीप वारियर.
(MI won the toss & decided to bowl first.)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘धोनी एक जादूगार, कचऱ्यालाही सोन्यात…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाने तोंडभरून केलं ‘थाला’चं कौतुक
‘दुखापत झाली नसती ना…’, वर्ल्डकप फायनलमधील पराभवाविषयी बोलला शाहीन आफ्रिदी