यावर्षी आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. या विश्वचषक स्पर्धेआधी न्यूझीलंड संघाला एक मोठा झटका बसला आहे. त्यांचा अष्टपैलू मायकल ब्रेसवेल दुखापतीमुळे विश्वचषकात खेळू शकणार नाहीये. दुखापतीमुळे विश्वषकातू माघार घेणारा ब्रेसवेल न्यूझीलंडचा दुसरा महत्वाचा खेळाडू ठरला आहे. याआधी कर्णधार केन विलियम्सन यानेही दुखपातीमुळे विश्वचषकातून माघार घेतली आहे.
मायकल ब्रेसवेल (Michael Bracewell) न्यूझीलंड क्रिकेट संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. मागच्या आढवड्यात इंग्लंडची टी-20 टूर्नामेंट व्हॅटेलिटी ब्लास्टमध्ये खेळताना त्याला दुखापत झाला. या लीगमध्ये तो वार्सेस्टरशायर संघाकडून खेळत होता. मागच्या आठवड्यात शुक्रवारी (9 जून) तो यार्कशायर संघाविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरला. पण वैयक्तिक 11 धावांची खेळी करून त्याला राटायर्ड हर्ट व्हावे लागले. नंतर तपासणी केल्यानंतर त्याची दुखापत गंभीर असल्याचे समोर आले.
माहितीनुसार 32 वर्षी अष्टपैलू खेलाडूवर गुरुवारी (15 जून) ब्रिटेनमध्ये शस्त्रक्रिया पार पडणार आहे. याच कारणास्तव पुढे सहा ते आठ महिने त्याला मैदानातून बाहेर राहावे लागणार आहे. अशात आगामी वनडे विश्वचषकात देखील तो संघासाठी उफलब्ध नसेल. न्यूझीलंड क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गॅर स्टेड यांनी ब्रेसवेलची दुखापत ही संघासाठी मोठा झटका असल्याचे सांगितले. प्रशिक्षकांना आशा आहे की, ब्रेसवेल मानसिक दृष्ट्या मजबूत आहे आणि लवकरच आपली फिटनेस मिळवू शकतो.
तत्पूर्वी न्यूझीलंडला कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याच्या रूपात विश्वचषकाआधी मोठा झटका बसला. इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये केन विलियम्सन गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. लीगच्या पहिल्याच सामन्यात त्याला दुखापत झाली आणि तो संपूर्ण हंगामात बाहेर पडला. काही दिवसांनंतर आगामी विश्वचषकापर्यंत विलियम्सन फिटनेस मिळवू शकणार नाही, अशा बातम्या समोर आल्या.
दरम्यान, आगामी विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात खेळला जाणार आहे. न्यूझीलंड देखील विश्वविजेतेपदासाठी प्रमुख दावेदार असेल. मागच्या वेळी 2019 विश्वचषकात न्यूझीलंड अंतिम सामन्यापर्यंत पोहोचली होती. पण अखेरीस त्यांना इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागाला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. (Michael Bracewell is injured and will not be able to play in ODI World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
सर्व माहितीः असे पाहा एमपीएलचे सामने लाईव्ह, तिकीटांपासून ते टाईमटेबल सर्वकाही एका क्लिकवर
मोठी बातमी! महाराष्ट्र प्रीमीयर लीगचे सामने स्टेडियमवर जाऊन पाहा, तेही चक्क मोफत