सोमवारी (दि. 1 मे) लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर पार पडलेला लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील आयपीएल 2023चा 43 वा सामना खेळला गेला. आरसीबीने या सामन्यात 18 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातून आरसीबीचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याने आयपीएलमध्ये पुनरागमन केले. मात्र, त्याच्या आयपीएलमध्ये खेळण्याच्या निर्णयावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने टीका केली आहे.
जोश हेजलवूड जानेवारी महिन्यापासून क्रिकेटपासून दूर होता. दुखापतीतून सावरत असल्याने त्याने आयपीएल 2023 मध्ये सुरुवातीचे आठ सामने खेळले नव्हते. लखनऊ विरुद्धच्या सामन्यातून त्याने पुनरागमन केले. यामध्ये त्याने 15 धावा देतो दोन बळी मिळवले. मात्र, असे असले तरी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने त्याच्यावर टीका केली. तो म्हणाला,
“हेजलवूड आयपीएल का खेळत आहे हे समजत नाही? तो आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची तयारी करताना दिसायला हवा होता. त्याला मैदानावर पाहताना आनंद होतो. मात्र, हा अंतिम सामना व त्यानंतर ऍशेस महत्वपूर्ण आहे.”
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना (World Test Championship Final 2023) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल येथे पार पडणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील हा सामना 7 जून ते 11 जून यादरम्यान पार पडणार आहे.
WTC अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ-
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ऍलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क. , डेव्हिड वॉर्नर.
(Michael Clarke Take Dig On Josh Hazlewood Who Playing IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शुबमन गिल हा फिरकीपटूंविरुद्ध खेळणारा मास्टर’, भारताच्या दिग्गज स्पिनरचे मोठे भाष्य
‘मी मागे हटणार नाही, हे माझ्या रक्तात…’, विराटसमोर सव्वाशेर का बनतोय नवीन? घ्या जाणून