Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मायकल हसीकडून भारताच्या ‘या’ फलंदाजाचे कौतुक, स्वतःच्या संघाला सुनावले खडेबोल

मायकल हसीकडून भारताच्या 'या' फलंदाजाचे कौतुक, स्वतःच्या संघाला सुनावले खडेबोल

February 24, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Michael Hussey

Photo Courtesy: Twitter/ICC


रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 मध्ये चांगले प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियावर आघाडी घेतली. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-0 अशा आघाडीवर आहे. रोहितने कर्णधार म्हणून चांगले प्रदर्शन केलेच, पण त्याची वैयक्तिक खेळीही चमकदार राहिली. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज मायकल हसी याने रोहितचे तोंड भरून कौतुक केले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील या कसोटी मालिकेत भारतीय संघाने पहिले दोन्ही सामने जिंकले. मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. भारताने हा सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. उभय संघांतील दुसरा कसोटी सामना दिल्लीत पार पडला. पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाला या सामन्यात 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला आणि बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकण्याच्या आशाही मावळल्या. गतविजेत्या भारताने या  दोन विजयांनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी रिटेन केली.

ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय खेळपट्टीवर खेळताना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागला आहे.  यावर्षीही परिस्थितीत काही वेगळी नव्हती. फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने अक्षरशः गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारतीय खेळाडू मात्र या खेळपट्टीवर सहजतेने खेळताना दिसले. याच पार्श्वभूमीवर मायकल हसी (Michael Hussey) याने ऑस्ट्रेलियन संघाला सल्ला दिली. हसीच्या मते ऑस्ट्रेलियाने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडून अशा खेळपट्टीवर कशी फलंदाजी करावी, हे शिकले पाहिजे.  “ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी रोहित शर्माकडून शिकले पाहिजे आणि पाहिले पाहिजे की, त्याने संपूर्ण मालिकेत कशा पद्धतीने फलंदाजी केली आहे. अशा परिस्थितीत त्याने कसा फिरकी गोलंदाजांचा सामना केला आणि धावा केल्या.”

दरम्यान, रोहितने या मालिकेत केलेल्या प्रदर्शनाचा विचार केला, तर नागपूरमध्ये त्याने 120 धावांची खेळी केली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दिल्ली कसोटीत रोहितने अनुक्रमे 32 आणि 31 धावा केल्या. (Michael Hussey praises Rohit Sarma)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“धोनीने आमच्या लीगमध्ये खेळावे”, आयपीएलमध्ये नेतृत्व करणाऱ्या विदेशी कर्णधाराची ऑफर
धक्कादायक! आयपीएलमध्ये खेळवण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा, युवा खेळाडूची तक्रार


Next Post
Virat Kohli Sonakashi Sinha

रोहितच्या लग्नात विराटने 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत धरला होता ठेका, जुना व्हिडिओ तुफान व्हायरल

akmal-gambhir

तब्बल 13 वर्षांनंतर अकमलने केला गंभीरसोबतच्या वादाबाबत खुलासा, म्हणाला...

Photo Courtesy: Twitter/ICC

BREAKING: इंग्लंडला धक्का देत यजमान दक्षिण आफ्रिका टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत! फायनलमध्ये देणार ऑस्ट्रेलियाला आव्हान

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143