क्रिकेटविश्वातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या ऍशेस मालिकेला ओळखले जाते. यावर्षी इंग्लंडमध्ये ही मालिका खेळली जाईल. मात्र, त्याचवेळी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने संघातील खेळाडूंवर टीका केली आहे. आपले खेळाडू ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला घाबरत असल्याचे त्याने म्हटले.
सध्या वॉर्नर भारतात आयपीएल खेळताना दिसतोय. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियासाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळेल. या सामन्यातील त्याच्या कामगिरीनंतरच त्याला ऍशेससाठी निवडायचे की नाही हा निर्णय ऑस्ट्रेलियन निवड समिती घेईल. कारण, त्याचा सध्याचा कसोटी फॉर्म अत्यंत खराब दिसला आहे. मागील इंग्लंड दौऱ्यावर त्याच्या बॅटमधून धावा आल्या नव्हत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने द्विशतक झळकावलेले. मात्र, भारत दौऱ्यावर पहिल्या दोन्ही कसोटीत खराब कामगिरीनंतर दुखापतग्रस्त होऊन तो मायदेशी परतलेला.
अशी परिस्थिती असताना देखील वॉन हा वॉर्नर धोकादायक ठरू शकतो असे म्हणताना दिसत आहे. एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला,
“वॉर्नरचा सध्याचा फॉर्म चांगला नसला तरी, इंग्लंडचा संघ त्याला घाबरतो. इंग्लंडच्या कर्णधाराला चिंता असेल की, तो फॉर्ममध्ये आल्यास आपल्या संघासाठी धोकादायक ठरू शकतो. इंग्लंडमधील त्याची कामगिरी चांगली नाही. मात्र, त्याच्यासारखा खेळाडू कधीही सामना बदलवू शकतो.”
यावेळी ऍशेस मालिकेचे यजमानपद इंग्लंडकडे आहे. या आधी झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने आपल्या घरच्या मैदानावर दमदार कामगिरी करत इंग्लंडला पराभूत केलेले. मात्र, त्यानंतर बेन स्टोक्स याने इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व स्वीकारल्यावर इंग्लंडने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. या मालिकेत आपल्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न ते करतील.
(Michael Vaughan Said England Team Having Fear Of David Warner Ahead Ashes)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केकेआरच्या विजयाने गुणतालिकेत खळबळ! मुंबईसह ‘हे’ संघ डू ऑर डाय स्थितीत, वाचा सविस्तर
“ईडन गार्डन्सवर रिंकू-रिंकू ऐकून अंगावर काटा येतो”, राणा-रसेलची दिलखुलास कबुली