क्रिकेटप्रेमी भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर शुक्रवारपासून(५ फेब्रुवारी) चेन्नई येथे भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघात कसोटी मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत केल्याने भारतीय संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे तसेच इंग्लंडच्या संघाने भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात शानदार खेळ करताना त्यांनी ते देखील जबरदस्त फॉर्म घेतले असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे इंग्लंड विजयी होईल, असे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्न याला वाटते, त्याने याबत ट्विट सुद्धा केले आहे. परंतु हाच ट्विट ते ट्रोल होण्यास कारणीभूत ठरत आहे.
काही दिवसांपूर्वीच मायकल वॉन यांनी भारताच्या एकतर्फी विजयाची भविष्यवाणी केली होती, परंतु चेन्नईत इंग्लंडच्या उत्कृष्ट फलंदाजीनंतर ते इंग्लंड संघाच्या विजयाच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी सांगितले. या कसोटीत भारत सहजरीत्या यश संपादित करेल असे प्रत्येकाला वाटले होते आणि काहींनी तर त्यासाठी भविष्यवाणी देखील केली होती, खुद्द इंग्लंडचा माजी कर्णधार वॉन यांनी सुद्धा हेच मत मांडले होते. परंतु इंग्लंड संघाने पहिल्या २ दिवशी शानदार खेळाचे प्रदर्शन केले. विशेषत: कर्णधार जो रुटने.
रुटने या सामन्यात द्विशतकी खेळी केली. इंग्लंडच्या आकर्षक खेळानंतर माजी कर्णधार मायकल वॉन यांनी ट्विट करून लिहिले आहे की, “मला माझा अंदाज बदलावा लागणार आहे, इंग्लंडचा संघ आता चांगली कामगिरी करत आहे. इंग्लंडचा संघ उच्च प्रतीचा सामना खेळत असून आता कुठेतरी ते आपला संघ अजून पुढे नेत आहेत”.
Think I may need to change my series prediction … !!! #India without @imjadeja in these conditions gives England a sniff … Plus this England Test team are playing high quality Test cricket !!! #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) February 6, 2021
मात्र, मायकल वॉन यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत त्यांच्या चाहत्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरून त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिलं होते की, ” फक्त इंग्लंडने आताशी फलंदाजी केली आहे, भारताची फलंदाजी अजून बाकी आहे.” तर दुसऱ्या चाहत्याने भारतीय संघ चेन्नईच्या खेळपट्टीवर १००० धावांचा पल्ला गाठेल, असं म्हटलं. तर आणखी एका चाहत्याने चक्क ‘रोहित शर्मा ३०० धावा आणि रहाणे २०० धावा करेल असे म्हटले.
😂😂😂wait for India to bat lol
— AniruddhS (@Anirudd72751149) February 6, 2021
https://twitter.com/Cricketpolls49/status/1357950085342973953
Calm down michael, got to feel for india. Just finished a long tour of aus, alot of pressure physically and mentally. They must be shattered the bowlers especially
— Niall Dawkins (@NiallDawkins) February 6, 2021
Every time you make a mistake you have to pay for it… Don't forget how strong is Indian batting side… If England scores 500, our batsmen can score 600 to 700 runs.
— Karthik18 (@karthikkohli180) February 6, 2021
Thank you for your change in prediction….Now you see how INDIA plays….Your prediction always goes wrong….So keep predicting that ENGLAND will win.
— Dev Sachdev (@DevSachdev19) February 6, 2021
https://twitter.com/simran_jeet7/status/1357949673068191744
whats with the predicting over and over, do you have gambling problems 😉 ? wait and watch till the end of the series! we have been seeing a lot of drama from Ind these days. They might play their 2nd string team which could be detrimental for the English team.
— KK_M (@kmusun1) February 6, 2021
Why you have to change it, now India will win
— Siddhant (@siddhantsonar10) February 6, 2021
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने द्विशतकी खेळी केली आहे. त्याने ३७७ चेंडूत २१८ धावा केल्या. या खेळीत रुटने १९ चौकार आणि २ षटकार मारले. तसेच चेन्नई येथे भारताविरुद्ध सुरु असलेला हा सामना रुटचा १०० वा कसोटी सामना असल्याने तो १०० व्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
त्याच्याशिवाय इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन स्टोक्सनेही ८२ धावांची खेळी केली. त्याआधी डॉम सिब्लीने ८७ धावांची खेळी केली होती. त्यामुळे इंग्लंडला दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत ८ बाद ५५५ धावा करता आल्या आहेत. दुसऱ्या दिवसाखेर भारताकडून इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि शहाबाज नदीमने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या संघव्यवस्थापनाची पहिल्या कसोटीसाठी हास्यास्पद संघनिवड, या दिग्गजाची टीका
दु:खद! पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि ५ विकेट्स घेणाऱ्या एकमेव क्रिकेटपटूचे निधन
इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत चेतेश्वर पुजारा शतक झळकावेल, दिग्गजाची भविष्यवाणी