सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन कोविड -१९ चाचणीत बुधवारी (२२ सप्टेंबर) पॉझिटिव्ह आढळला आहे. यावर, बीसीसीआयने म्हटले आहे की, संघाचा आयपीएल २०२१ मधील दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना संध्याकाळी (२२ सप्टेंबर) पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होईल. या प्रकणावर, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाच्या प्रवेशाबद्दल बीसीसीआयला टोला लगावला आहे.
टी नटराजन कोविड -१९ पॉझिटिव्ह असल्याच्या बातमीनंतर वॉनने लगेचच ट्विट केले, “आयपीएल शेवटच्या मँचेस्टर कसोटीप्रमाणे रद्द होते का ते पाहूया! ते होणार नाही याची मी हमी देतो.” भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टरमध्ये खेळला जाणारा शेवटचा कसोटी सामना मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सहाय्यक कर्मचारी कोविड -१९ पॉझिटिव्ह असल्यामुळे रद्द करावा लागला होता.
वेगवान गोलंदाज नटराजन नुकताच गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून परत येत आहे, पण तो दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या जवळच्या संपर्कात आलेल्या सहा जणांनाही विलगिकरणात पाठवण्यात आले आहे. ज्यात अष्टपैलू विजय शंकर हा देखील आहे.
Let’s see if the IPL gets cancelled like the last Test !!!!! I guarantee it won’t be … #OnOn https://t.co/HV7V70i69x
— Michael Vaughan (@MichaelVaughan) September 22, 2021
बीसीसीआयच्या माहितीनुसार, “सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू टी नटराजन याची आरटी-पीसीआर चाचणी पॉझिटीव्ही आली आहे. नटराजनने स्वतःला उर्वरित संघापासून वेगळे केले आहे आणि आत्तापर्यंत त्यास कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत.
माहितीनुसार, उर्वरित संघाची बुधवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ५ वाजता आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली. प्रत्येकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेळापत्रकानुसार खेळला जाईल.
आता नटराजनला आता १० दिवस विलगिकरणामध्ये राहावे लागेल आणि त्याला बायो-बबलमध्ये परत येण्यासाठी दोनदा निगेटिव्ह चाचणी येणे गरजेचे आहे. सनरायझर्स हैदराबादसाठी हा एक मोठा झटका असेल, कारण दुखापतीमुळे संघ पहिल्या टप्प्यात नटराजनला खेळवू शकला नाही. तीस वर्षीय नटराजनने आयपीएलमध्ये २४ सामने खेळले आणि २० बळी मिळवले.
भारतातील बायो-बबलमध्ये अनेक कोविड -१९ पॉझिटिव्ह प्रकरणांची नोंद झाल्यानंतर मे महिन्यामध्ये आयपीएल थांबवण्यात आले होते. जे आता यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाले आहे. त्यावेळी सनरायझर्स हैदराबादचा वरिष्ठ यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा हा कोविड -१९ पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. त्याच्या अहवालानंतर आयपीएल थांबण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: अन् चालू सामन्यात अचानक मैदानात उतरले हेलिकॉप्टर, काही क्षणांसाठी खेळही थांबला
केकेआरविरुद्ध खेळणार का रोहित आणि हार्दिक? बोल्टने दिली महत्त्वपूर्ण माहिती
पंजाबविरुद्ध रियान परागने १९ वे षटक टाकणाऱ्या मुस्तफिजुर रहमानला दिला होता ‘हा’ कानमंत्र