मायकेल वॉन आणि अँड्र्यू फ्लिंटॉफ या इंग्लंडच्या दिग्गज जोडीनं 15 वर्षांपूर्वी त्यांची कसोटी कारकीर्द संपवली. आता त्यांच्या मुलांनी क्रिकेटच्या मैदानावर एंट्री केली आहे. वॉन आणि फ्लिंटॉफ यांनी 1999 ते 2008 दरम्यान एकत्र 48 कसोटी सामने खेळले आहेत.
ॲशेस-विजेत्या इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनचा मुलगा आर्ची वॉन आणि अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा रॉकी फ्लिंटॉफ यांचा इंग्लंडच्या अंडर 19 कसोटी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. या दोघांनी आधीच युवा स्तरावरील वनडेमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. इंग्लंडचा सध्याचा लेगस्पिनर रेहानचा भाऊ फरहान अहमद आणि इंग्लंडचा माजी फलंदाज जो डेन्लीचा 17 वर्षीय पुतण्या जेडेन डेन्ली यांनाही संघात स्थान मिळालं आहे.
टॉप ऑर्डर बॅट्समन आणि ऑफ-स्पिनर 18 वर्षीय आर्चीनं या हंगामाच्या सुरुवातीला त्याच्या पहिल्या व्यावसायिक करारावर सॉमरसेटचं प्रतिनिधित्व केलं होतं. तो 2020 पासून टाँटन येथील काउंटीच्या अकादमीचा भाग आहे. मात्र, आर्चीला अद्याप सॉमरसेटच्या अव्वल संघाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही.
गेल्या आठवड्यात युवा वयोगट स्तरावर त्यानं इंग्लंडच्या अंडर-19 एकदिवसीय संघाविरुद्धच्या सराव सामन्यात यंग लायन्स इनव्हिटेशन इलेव्हनसाठी 83 चेंडूत 85 धावा करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. उजव्या हाताचा अष्टपैलू रॉकीनेॉं इंग्लंड संघाकडून सर्वाधिक 106 धावा केल्या होत्या.
इंग्लंडच्या अंडर-19 संघाचा सामना श्रीलंकेच्या अंडर-19 संघाशी 8 ते 11 जुलै दरम्यान वर्म्सले येथे आणि 16 ते 19 जुलै दरम्यान चेल्तेनहॅम येथे होणार आहे.
इंग्लंड अंडर-19 कसोटी संघ – हमजा शेख (कर्णधार), फरहान अहमद, चार्ली ब्रँड, जॅक कार्नी, जेडेन डेन्ली, रॉकी फ्लिंटॉफ, केशा फोन्सेका, ॲलेक्स फ्रेंच, ॲलेक्स ग्रीन, एडी जॅक, फ्रेडी मॅककॅन, हॅरी मूर, नोहा थाईन आणि आर्ची वॉन
महत्त्वाच्या बातम्या –
10 षटकात 19 धावा अन् 6 विकेट…42 वर्षीय जिमी अँडरसनला खरंच तोड नाही..!!
टी20 विश्वचषकानंतर या 9 दिग्गजांनी घेतली निवृत्ती; काहींनी टी20, तर काहींनी सर्व फॉरमॅटला केलं बाय-बाय!
पुढील आयसीसी स्पर्धा कधी आणि कुठे खेळली जाईल? जाणून घ्या सर्व अपडेट