---Advertisement---

वॉनचे टिकास्त्र थांबेना! आता ‘हा’ व्हिडिओ शेअर करत साधला अहमदाबादच्या खेळपट्टीवर निशाणा

On: बुधवार, मार्च 3, 2021 11:15 PM
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका सुरु असून या कसोटी मालिकेचा चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ४ मार्चपासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉनने पुन्हा एकदा खेळपट्टीबद्दल एक पोस्ट करत टीका केली आहे.

खेळपट्टीबद्दल चर्चेला उधाण

खरंतर तिसरा कसोटी सामना देखील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. हा सामना केवळ २ दिवसातच भारताने १० विकेट्सने जिंकला. या सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून गेलेल्या ३० विकेट्सपैकी २८ विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या होत्या. त्यामुळे खेळपट्टीवर फलंदाजांना काहीच मदत नव्हती, खेळपट्टी केवळ फिरकी गोलंदाजांना अनुकुल होती, अशा टीका झाल्या. टीका करणाऱ्यांमध्ये वॉन देखील होते.

वॉन यांची पुन्हा टीका

आता चौथ्या कसोटी आधी देखील वॉन यांनी खेळपट्टीबद्दल पोस्ट केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात विल्मस्लो या इंग्लंडमधील एका छोट्या गावातील खोदलेली जमीन दिसत आहे. तसेच त्यांनी या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘भारत विरुद्ध इंग्लंड संघातील बहुप्रतिक्षीत चौथ्या कसोटीच्या खेळपट्टीचा अहवाल’.

या व्हिडिओमध्ये जमीनीवरील मातीची ढेकळं हातात घेत वॉन म्हणत आहेत, ‘मागच्या काही कसोटीत खेळपट्टीबद्दलच चर्चा आहे. या आठवड्यातही असेल. हे खुपच सुंदर दिसत आहे.’ तसेच त्यांनी असेही म्हटले की ‘कसोटी सामन्याच्या स्तरावर त्यास सामोरे जाण्यास सक्षम असले पाहिजे.’

https://www.instagram.com/p/CL8sq3Vlahm/

याआधीही वॉन यांचा खेळपट्टीवर निशाना

खेळपट्टीवर टिका करण्याची वॉन यांची ही पहिली वेळ नाही. त्यांनी काहीदिवसापूर्वीही खोदलेल्या जमीनीवर फलंदाजी करतानाचा फोटो शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते की “चौथ्या कसोटीसाठी सराव करत आहे.” तसेच त्याहीआधी एक शेतकरी नांगरणी करत असतानाचा फोटो पोस्ट करत खेळपट्टीबद्दल टीका केली होती.

https://www.instagram.com/p/CL6fmW_LPgf/

https://www.instagram.com/p/CLzAvdYru6k/

 

वॉन सातत्याने चर्चेत 

सोशल मीडियावर वॉर्न खूप ऍक्टिव्ह असतात. ते क्रिकेटबद्दल नेहमीच त्यांची मतं मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अनेकदा ते चर्चेत येतात. तसेच बऱ्याचदा ट्रोलही होत असतात. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेदरम्यान देखील ते त्यांच्या भविष्यवाणीमुळे चर्चेत आले होते. त्यांनी कसोटी मालिका होण्याआधी अंदाज वर्तवला होता की ऑस्ट्रेलिया संघ ४-० ने भारताचा पराभव करेल. पण भारतानेच २-१ अशा फरकाने ऑस्ट्रेलियाला नमवले. यानंतर वॉर्न ट्रोल झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

चौथा कसोटी सामना भारत, इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूंसाठी ठरु शकतो खास, मोठे विक्रम करण्याची संधी

भुतकाळात डोकावताना: जर २६/११ चा हल्ला झाला नसता, तर श्रीलंकेऐवजी टीम इंडीयाच्या सचिन, धोनी, द्रविडवर झाला असता हल्ला

‘मला श्रीसंत नाही, ब्रेट ली बनायचंय’, भारतीय खेळाडूची ७ वर्षांपूर्वीची कमेंट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---