मागच्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना स्थगित केला गेला होता. कोरोनाच्या कारणास्तव हा निर्णय घ्यावा लागल्यामुळे यावर्षी १ जुलैपासून हा पाचवा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशीय भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने शतक ठोकले. पंतच्या या प्रदर्शनासाठी सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने पंतची स्तुती करण्यासाठी एक ट्वीट केले, पण चाहते या ट्वीटमुळे नाराज झाल्याचे दिसत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या या पाचव्या आणि मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह भारताचे नेतृत्व करत आहे. नाणेफेक गमावल्यानंतर भारताला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. वरची फळी स्वस्तात बाद झाल्यानंतर रिषभ पंत (Rishabh Pant) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी संघाचा डाव सांभाळला. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी २२२ धावांची भागीदारी झाली. पंतने पहिल्या डावात १११ चेंडूत १४६ धावा केल्या. यामध्ये १९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
पंतच्या या धडाकेबाज खेळीनंतर सर्वच स्तरांमधून त्याचे कौतुक होत आहे. अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर पंतविषयी खास पोस्ट केल्या. या यादीत दिग्गज मायकल वॉन (Micheal Vaughan) याचेही नाव जोडले गेले. वॉनने केलेल्या ट्वीटमध्ये त्याने पंतची तुलना इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) याच्याशी केली. ट्वीटमध्ये त्याने लिहिले की, “हे पाहण्यासाठी खूप चांगले आहे की, रिषभ पंत बेयरस्टोप्रमाणे खेळत आहे.” या पोस्टमध्ये वॉनने पंतला टॅग देखील केले आहे.
This is great viewing .. @RishabhPant17 doing a Jonny B … #ENGvIND
— Michael Vaughan (@MichaelVaughan) July 1, 2022
दरम्यान, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात नुकत्याच खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत जॉनी बेयरस्टो उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला होता. याच पार्श्वभूमीवीर वॉनने हे ट्वीट केले. पंत आणि बेयरस्टो यांच्यात वॉनने तुलना केल्यामुळे, चाहते नाराज दिसत आहे. अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत की, बेयरस्टो अलिकडेच चांगले प्रदर्शन करू लागला आहे, पण पंत खूप आधीपासून चांगला खेळत आहे. चाहत्यांच्या मते पंत आधीपासून चांगले प्रदर्शन करत असल्यामुळे बेयरस्टो त्याचे अनुकरण करतो, असे म्हटले जाऊ शकते. अनेकांना वॉनला पक्षपाती म्हटले आहे.
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर पहिल्या दिवशी पंतचे शतक आणि जेडजाच्या नाबाद ८३ धावांच्या जोरावर भारताने ३३८ धावा केल्या. यादरम्यान, ७ खेळाडूंना विकेट्स गमावल्या. दुसऱ्या दिवशी जडेजाने त्याचे शतक पूर्ण केले आणि संघ ४१६ धावा करून सर्वबाद झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बुमराहचा मार खाणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडचा कौतुक करणारा विक्रम, ठरला इंग्लंडचा दुसराच खेळाडू
‘कर्णधार’ बुमराहचा फुल ऑन राडा! नाबाद ३१ धावांची तुफानी खेळी करत रचला इतिहास
भारताविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करण्यापूर्वीच जो रुटने रचलाय इतिहास! जाणून घ्या सविस्तर