क्रीडा स्पर्धांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिंपिकला टोकियो येथे २३ जुलैपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत आत्तापर्यंत भारताला केवळ एक पदक मिळवण्यात यश आले आहे. हे पदक मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. या यशानंतर तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले. ती नुकतीच सोमवारी टोकियोमधून भारतात परतली आहे.
विमानतळावर झाले जंगी स्वागत
मीराबाई चानू सोमवारी टोकियोमधून दिल्ली येथे पोहचली. ती दिल्ली विमानतळावर पोहचल्यानंतर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. ती आल्यानंतर विमानतळावरील स्टाफने ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. तसेत त्यांनी तिला गार्ड ऑफ ऑनरही दिला. त्याचबरोबर मीराबाईची दिल्लीत पोहचल्यानंतर आरटी-पीसीआर चाचणी देखील करण्यात आली. मीराबाईसह तिचे प्रशिक्षक विजय शर्मा देखील दिल्लीत परतले आहेत.
#WATCH | Olympic silver medallist Mirabai Chanu receives a warm welcome as the staff at the Delhi airport cheered for her upon her arrival from #TokyoOlympics pic.twitter.com/VonxVMHmeo
— ANI (@ANI) July 26, 2021
वेटलिफ्टिंगमधील दुसरे ऑलिंपिक पदक
मीराबाईने शनिवारी २०२ किलोग्रॅम वजन उचलत रौप्य पदकाला गवसणी घातली. याबरोबरच भारताला वेटलिफ्टिंगमध्ये दुसरे ऑलिंपिक पदक मिळाले. यापूर्वी कर्नम मल्लेश्वरीने २००० साली झालेल्या सिडनी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
मीराबाईवर बक्षीसांचा वर्षाव
मीराबाईवर सध्या कौतुकाबरोबरच बक्षीसांचाही वर्षाव होत आहे. तिला मणिपूर सरकारतर्फे १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. याबरोबरच पोलीस खात्यात उच्च पदावर नोकरीस घेत असल्याचेही मणिपूर सरकारने जाहीर केले आहे. याशिवाय डॉमिनोजने मीराबाईला कायमसाठी फ्री पिझ्झा देणार असल्याचे सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मणिपूर सरकारने मिराबाई चानूला देऊ केली पोलिस खात्यात नोकरी, दिले ‘हे’ महत्त्वपूर्ण पद
रिषभचा इंग्लंडमधील नवा मित्र पाहिला का? स्वतः शेअर केला व्हिडिओ
आयपीएलच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या फॅन्सने केले सीएसके चाहत्यांना ट्रोल, पाहा मजेदार मीम