---Advertisement---

बाप बाप असतो! मुलीपासून वेगळा राहत असला तरीही शमीच्या बड्डेदिनी लाडक्या लेकीला ‘खास’ शुभेच्छा

On: रविवार, जुलै 18, 2021 8:34 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इथे भारतीय संघाला पुढील महिन्यात इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. परंतु ही मालिका सुरू होण्याअगोदर भारतीय संघाला तीन आठवड्यांची सुट्टी दिली होती, जी सुट्टी नुकतीच संपवून भारतीय संघ आगामी कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे.

परंतु याचदरम्यान मोहम्मद शमीला मुलगी आयराची आठवण येत आहे. खरंतर मोहम्मद शमीची मुलगी आयराला 17 जुलैला 6 वर्षे पूर्ण झाली. आयराच्या वाढदिवसानिमित्त शमीने सुंदर असा संदेश इंग्लंडहून पाठविला आहे. त्यासोबतच आयराचा एक सुंदर फोटो देखील पोस्ट केला आहे.

मोहम्मद शमीने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत काळजाला भिडणारे असे कॅप्शन लिहिले आहे. जे वाचून सर्वांच्याच लक्षात येईल की, शमी आपल्या मुलीपासून वेगळे राहत असला तरीही त्याला तिची किती आठवण येत आहे.

शमीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 
शमीने सर्वांत अगोदर आयराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने लिहिले की, “माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

त्यानंतर शमीने पुढे लिहिले की, “तू माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेस. तू माझ्यासाठी सर्व काही आहेस, याची तुला जाणीव होईल. तू मला सकारात्मक उर्जा देतेस, तू माझी लाडकी आणि समंजस मुलगी आहेस. तुला माझी मुलगी म्हणताना मला अभिमान वाटतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या परफेक्ट लिटिल गर्ल.”

मोहम्मद शमीने पोस्ट केलेल्या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केली आहे आणि आयराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शमीच्या भावापासून ते भारतीय संघातील क्रिकेटपटूंनी आयराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, त्याचबरोबर आपला आशीर्वाद देखील दिला आहे. यामध्ये भारतीय संघाचे माजी खेळाडू मोहम्मद कैफ यांनी कमेंट केली आणि लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबो.’

https://www.instagram.com/p/CRZhok4pfpS/?utm_source=ig_web_button_share_sheet

मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यामध्ये अजूनही वाद सुरू आहे. हसीनने शमीविरूद्ध घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्याबरोबर शमीच्या भावावर लैंगिक शोषणाचा देखील आरोप केला होता. तसेच दोघांनी अद्याप घटस्फोट घेतलेला नसला तरीही ते दोघे स्वतंत्र राहत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंकेच्या नवनियुक्त कर्णधाराने फुंकले रणसिंग; म्हणाला, ‘युवा खेळाडूंमुळे आम्हाला असा होणार फायदा’

कर्णधार धवन म्हणाला, कोहली अन् शास्त्रींच्या ‘खास खेळाडू’ला श्रीलंकेत खेळवणार; पण कोण आहे तो?

भारत-श्रीलंका मालिकांसाठी समालोचकांचे पॅनेल जाहीर, भारताच्या ‘या’ २ दिग्गजांचा समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---