फेब्रुवारी 2023 मध्ये ऍरॉन फिंच याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. फिंचच्या निवृत्तीनंतर मागच्या काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलियाला नव्या टी-20 कर्णधाराचा शोध होता. सोमवारी (07 ऑगस्ट) हा शेध पूर्ण झाला, असे म्हणता येईल. मिचेल मार्श दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा केली गेली आहे. या संघात स्टीव स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल आणि ऍडम झॅम्पा असे खेळाडू आहेत. पण ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनापुढचा सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे कर्णधारपदाचा. शेवटी मिचेल मार्श याला ही जबाबदारी सोपवली गेली. मागच्या काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये याविषयी अदाज देखील वर्तवले गेले होते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला तीन सामन्यांची टी-20 आणि 5 वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते जॉर्ज बेली याविषयी म्हणाले की, “मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मिचेल मार्श वरिष्ठ खेळाडू आहे. आता त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली शैली सिद्ध करण्याची संधी आहे. आम्ही आशा करतो की, तो चांगले नेतृत्व करेल आणि संघाला पुढे घेऊन जाईल.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ –
ऑस्ट्रेलिया टी-२० संघ: मिचेल मार्श (कर्णधार), शॉन ऍबॉट, जेसन बेहरनडॉर्फ, टिम डेव्हिड, नेथन एलिस, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, ऍडम झाम्पा.
दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संग भारत दौऱ्यावर आहे. भारतासोबत देखील ऑस्ट्रेलिया संघाला तीन वनडे सामने खेळायचे आहेत. भारतासोबतची मालिका संपल्यानंतर भारतामध्येच वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा दक्षिण आफ्रिका आणि भारत दौरा, सोबतच वनडे विश्वचषकासाठी संघ व्यवस्थापन णि निवडकर्ते यांनी एकच 18 सदस्यीय संघ घोषित केला आहे. विशेष म्हणजे विश्वचषकासाठी निवडलेल्या या संघा महत्वाचा ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्नस लॅबुशेन याला निवडले गेले नाहीये.
दक्षिण आफ्रिका आणि भारत दौऱ्यासह विश्वचषक 2023 साठी ऑस्ट्रेलिनय संघ –
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ऍबॉट, ऍश्टन अगर, ऍलेक्स कॅरे, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, ऍरॉन हार्डी, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस , डेव्हिड वॉर्नर, ऍडम झाम्पा.
(Mitchell Marsh has been named as Australian captain for upcoming T20I series against South Africa)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! न्यूझीलंडच्या दिग्गजाने जॉईन केली ऑरेंज आर्मी, हैदराबाद फ्रँचायझीकडून ब्रायन लारा करारमुक्त
तिलक वर्माच्या अनोख्या सेलिब्रेशनमागे रोहितच्या मुलिचा हात! पराभवानंतर फलंदाजाने स्वतः दिली माहिती