रविवारी(8 सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्ध चौथ्या ऍशेस कसोटीत 185 धावांनी विजय मिळवला. तर दुसरीकडे 2948 किलोमीटर दूर ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडीज महिला संघा विरुद्ध दुसऱ्या वनडेत 151 धावांनी विजय मिळवला.
विशेष म्हणजे चौथ्या ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क दुसऱ्या डावात गोलंदाजी करत असताना त्याचवेळी त्याची पत्नी ऐलिसा हेली ऑस्ट्रेलिया महिला संघाकडून वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या वनडेत खेळत होती. त्यामुळे रविवारी एक खास योगायोगही पहायला मिळाला.
जेव्हा स्टार्कने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या डावात रविवारी यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोची विकेट घेतली त्याचवेळी त्याची पत्नी एलिसाने इकडे विंडीज विरुद्ध शानदार चौकार मारला. या दोन्ही घटना साधारण एकाच वेळी घडल्या.
या घटनेचा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाची माजी महिला कर्णधार लिसा स्थळेकरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
So Starc gets a wicket & at the same time 2948 kms Healy smacks a 4. Love watching them both!! pic.twitter.com/ANzWQNprre
— Lisa Sthalekar (@sthalekar93) September 8, 2019
स्टार्कने इंग्लंड विरुद्ध चौथ्या ऍशेस सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या. तर एलिसाने वेस्ट इंडीज विरुद्ध 43 चेंडूत 51 धावा केल्या. यात तिने 10 चौकार आणि 1 षटकार मारला.
स्टार्क आणि एलिसा यांनी 15 एप्रिल 2016 मध्ये लग्न केले आहे. दोघेही ऑस्ट्रेलियाच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला संघाचे नियमित सदस्य आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत ‘असा’ कारनामा करणारा राशिद खान पहिलाच खेळाडू
–राशिद खानच्या अफगाणिस्तानने बांगलादेशला कसोटीत पराभूत करत रचला इतिहास
–टॉप ३: चौथ्या ऍशेस कसोटीतील ‘सामनावीर’ स्टिव्ह स्मिथने केले हे खास ३ विक्रम