ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघामध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळला जातोय. या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात मिचेल स्टार्क याने तेजनारायण चंद्रपॉल याला 45च्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले. तेजनारायण याने 126 चेंडू खेळत 4 चौकार लगावले. स्टार्कनेे 37व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तेजनारायणला बाद केले. त्यावेळी संघाची धावसंख्या 116 अशी होती. याबरोबरच स्टार्कने एक अनोखा विक्रम केला आहे.
मिचेल स्टार्क याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाप आणि मुलाला बाद करणारा गोलंदाज बनला आहे. तेजनारायण चंद्रपॉल (Tagenarine Chanderpaul) याला बाद करण्याआधी त्याने 2012मध्ये शिवनारायण चंद्रपॉल (Shivnarine Chanderpaul) याला बाद केले होते. तेजनारायण आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. त्याने वेस्ट इंडिज संघासाठी या कसोटीत आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तेजनारायण याची फंलदाजीची शैली आपल्या वडीलांप्रमाणेच आहे. तो देखील खेळपट्टीवर मार्क घेण्यासाठी स्टंपवरील बेल्सचा वापर करतो. तेजनारायण याचे वडील शिवनारायण चंद्रपॉल यांनी 2016मध्ये आतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तेजनारायण याने 2022मध्ये वेस्ट इंडिज संघासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 598 धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाकडून या डावात मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschangne) आणि स्टीव स्मिथ यांनी झंझावती द्विशतके झळकावली. लॅब्युशेन याने 350 चेंडूत 204 धावा केल्या आणि स्टीव स्मिथ याने 311 चेंडूत 200 धावा केल्या. वेस्ट इंडिजने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 283 धावा केल्या. या डावात वेस्ट इंडिज संघासाठी क्रेग ब्रेथवेट आणि तेजनारायण चंद्रपॉल यांनी अर्धशतके झळकावली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 182 धावा करत डाव घोषीत केला. या डावात पुन्हा एकदा लॅब्युशेनने शतक झळकावले. त्याने 110चेंडूत 104 धावा केल्या. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिज संघाने चौथ्या दिवसाअखेर 3 गडी गमावत 193 धावा केल्या आहेत. शेवटच्या दिवशी त्यांना विजयासाठी 92 षटकात 306 धावांची गरज आहे.(Mitchell Starc took wicket of father and son in International cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिकी पाँटिंगचे कॅमेंट्री बॉक्समध्ये कमबॅक! तब्येतीविषयी माहिती देताना म्हणाला, ‘माझ्यासाठीही…’
बांगलादेशला धक्क्यावर धक्के, ‘या’ गोलंदाजाच्या बाहेर जाण्याने रोहितची चिंता मिटली