---Advertisement---

विश्वचषकात मिताली ‘राज’! पाकिस्तानविरुद्ध मैदानात पाय ठेवताच भारतीय कर्णधाराने रचला विश्वविक्रम

Mithali-Raj
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women’s Team) सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. न्यूझीलंडमध्ये यावर्षीचा आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक (ICC Women’s World Cup 2022) खेळला जात आहे. रविवारी (६ मार्च) भारत आणि पाकिस्तान महिला संघांनी एकमेकांविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक अभियानाची सुरुवात केली. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिने मैदानात पाय टाकताच एक मोठा विक्रम केला. हा विक्रम करणारी मिताली आता जागतिक क्रिकेटमधील तिसरी खेळाडू ठरली आहे.

मिताली राज मागच्या मोठ्या काळापासून भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. यावर्षी खेळला जाणारा विश्वचषक तिच्या कारकिर्दीतील ६ वा विश्वचषक आहे. यापूर्वी जागतिक क्रिकेटमध्ये फक्त दोन खेळाडू असे होऊन गेले आहेत, ज्यांनी कारकिर्दीत ६ विश्वचषकांमध्ये राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये पाकिस्तान संघाचे दिग्गज जावेद मियाँदाद (Javed Miandad) आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा समावेश आहे.

मितालीने कारकिर्दीत पहिला विश्वचषक २००० साली खेळला होता. त्यानंतर तिने २००५, २००९, २०१३ आणि २०१७ या महिला विश्वचषकांमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व केले. ती ६ विश्वचषक खेळणारी पहिला महिला क्रिकेटपटू आहे.

मिताली राजच्या नेतृत्वात भारतीय संघ मागच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. अंतिम सामन्यात संघाला इंग्लंडकडून ९ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यापूर्वी भारतीय संघ २००५ सालच्या विश्वचषकातही अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता आणि त्यावेळीही मिताली संघाची कर्णधार होती. मिताली राज दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये अंतिम सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणारी एकमेव कर्णधार आहे.

त्याव्यतिरिक्त भारतीय संघाची दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) तिच्या कारकिर्दीतील ५ वा विश्वचषक खेळत आहे. जागतिक क्रिकेटमध्ये पाच महिला विश्वचषकांमध्ये खेळणाऱ्या सहा खेळाडू आहेत. त्या सहा खेळाडूंपैकी एक म्हणजे झुलन गोस्वामी.

महत्वाच्या बातम्या –

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेन वॉर्नचे ‘ते’ तीन सामने, ज्यांनी त्याला बनवले ‘फिरकीचा जादूगार’

Ranji Trophy: अजिंक्य रहाणे गोल्डन डक, तर ‘या’ खेळाडूंचे तिसऱ्या सामन्यात कमाल प्रदर्शन

गतविजेत्या मुंबई सिटीचे आव्हान संपुष्टात, हैदराबादच्या विजयाने केरला ब्लास्टर्स उपांत्य फेरीत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---