पुणे : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी नुकतीच ‘आझम कॅम्पस’ ला भेट देऊन क्रीडाविषयक प्रगतीचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, एस ए इनामदार, इरफान शेख, आझम स्पोर्ट्स अकादमीचे गुलझार शेख यांनी स्वागत केले.
अझरुद्दीन यांनी कॅम्पस मधील क्रिकेट मैदान आणि पॅव्हेलियनची पाहणी केली. आझम स्पोर्ट्स अकादमी च्या क्रीडापटू विद्यार्थ्यांशी अझरुद्दीन यांनी संवाद साधला. या भेटीदरम्यान अझरुद्दीन समवेत रियाझ बागवान हे उपस्थित होते.
अझरुद्दीन हे भारतीय संघाचे माजी कर्णधार व विख्यात फलंदाज आहेत. मूळचे हैद्राबादचे असलेले अझरुद्दीन आपल्या शैलीदार फलंदाजीसाठी ओळखले जात असत. भारताकडून ९९ कसोटी सामने खेळताना त्यांनी ४५.०४ च्या सरासरीने २२ शतकांसह ६२१५ धावा केल्या आहेत. तसेच ३३४ वनडे सामन्यांमध्ये ३६.९२ च्या सरासरीने ७ शतकांसह ९३७८ धावा केल्या आहेत. ते भारताच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक मानले जातात.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! तब्बल सात खेळाडू ठरले पद्मश्री पुरस्काराचे मानकरी, भारत सरकारने केली घोषणा
भारतात पोहचण्याआधीच इंग्लडला बसला धक्का, कठोर नियमांमुळे सरावासाठी मिळणार फक्त इतके दिवस
पुन्हा घुमणार सचिन..सचिनचा आवाज; सुरू होणार ही मोठी स्पर्धा