---Advertisement---

“त्या खेळाडूला पाहिल्यावर होते राहुल द्रविडची आठवण”

On: शनिवार, डिसेंबर 5, 2020 5:26 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. त्याने अनेकदा खेळापट्टीवर टिच्चून फलंदाजी करत भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. एवढेच नाही तर संघव्यवस्थापन टाकेल ती जबाबदारी खंबीरपण द्रविडने उचलली. आता त्याच्याशी सध्या भारतीय संघात खेळणाऱ्या एका खेळाडूची तुलना मोहम्मद कैफने केली आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू कैफने शुक्रवारी(4 डिसेंबर) भारत-ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या पहिल्या टी20 सामन्यानंतर बोलताला भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलची तुलना द्रविडशी केली आहे.

कैफ म्हणाला, ‘केएल राहुल मला राहुल द्रविडची आठवण करुन देतो. तो कोणतीही भूमिका पार पाडण्यासाठी तयार असतो. यावरुन समजते तो एक चांगला संघसहकारी आहे. जर तुम्ही त्याला 5 व्या क्रमांकावर खेळायला सांगितले, तो ती भूमिका संघासाठी पार पाडतो. जर तुम्हा त्याला यष्टीरक्षण करायला सांगितले तरी तो करतो. त्याला सलामीला फलंदाजी करायला सांगितली तरी करतो. एका कर्णधाराला आणि संघव्यवस्थापनाला केएल राहुल सारखा खेळाडू हवा असतो. त्याच्यासारखे खुप कमी खेळाडू असतात.’

शुक्रवारी केएल राहुलने सुरुवातीला आक्रमक फटके मारले होते. पण भारताच्या वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्याने त्याने संयमी खेळ करत 40 चेंडूत 51 धावांची खेळी केली होती.

त्याच्या खेळीबद्दल बोलताना कैफ म्हणाला, ‘त्याने सुरुवातील जलद खेळ केला होता. पण त्याला समोर विकेट्स पडताना पाहून त्याचा वेग कमी करावा लागला. त्याला स्ट्राईकही सारखी मिळत नव्हती आणि जेव्हा तुम्हाला स्ट्राईक मिळते, तेव्हा तुम्ही गोंघळता की मोठे फटके खेळावे की एकेरी दुहेरी धावांवर भर द्यावा, कारण विकेट्स गेलेल्या असतात.’

पुढे कैफ म्हणाला, ‘मला वाटते त्याची परिपूर्ण खेळी होती. त्याने चांगली सुुरुवात केली होती. नंतर आपण त्याच्याकडून 80-90 धावांच्या खेळीची अपेक्षा केली. पण तो बाद झाला. पण एकंदरीत ती चांगली खेळी होती. कारण एक फलंदाज परिस्थितीनुसार फलंदाजी करतो. तसेच याचा अर्थ असा नाही की तो मोठे शॉट्स खेळू शकत नाही. त्याला वाटेल तेव्हा तो मोठे शॉट्स खेळू शकला असता. तो एका षटकात 20 धावाही काढू शकतो. पण त्याने त्याची लय बदलली नाही कारण समोरुन विकेट्स जात होते आणि त्याला शेवटपर्यंत खेळायचे होते.’

शुक्रवारी भारताने राहुलच्या 51 धावांच्या खेळीच्या जोरावर आणि रवींद्र जडेजाने केलेल्या आक्रमक 44 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकात 161 धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 150 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना 11 धावांनी जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या –

‘…तर तुम्ही कन्कशन सब्स्टिट्यूट घेण्यास पात्र नाही’, भारतीय दिग्गजाची नव्या नियमावर नाराजी

VIDEO : ‘कन्कशन सब्टीट्यूट’ म्हणून चहलची निवड केल्याबद्दल थेट सामना रेफरीशी भिडले लँगर 

आयपीएलची रचना बदलण्याचा बीसीसीआयचा मानस; दोन नवीन संघांसह आकर्षक बदलांचा समावेश

ट्रेंडिंग लेख –

…म्हणून पुण्यात २० वर्षांपूर्वी झालेला ‘तो’ सामना सचिन तेंडुलकरसाठी ठरला खास

मराठीत माहिती- क्रिकेटर शिखर धवन

‘कन्कशन सब्सटिट्यूट’ म्हणजे नक्की काय रे भाऊ?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---