मुंबई । अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राम मंदिराचे भूमिपूजन केले आणि त्यानंतर मंदिराचे बांधकाम होणार आहे. यावेळी मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचवेळी माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने एक खास संदेश दिला आहे.
मोहम्मद कैफ यांनी चाहत्यांना आवाहन केले की, हा एक खास प्रसंग आहे आणि यावेळी कोणत्याही प्रकारचा द्वेष वाढवू नये. कैफने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, ”मी अलाहाबादसारख्या शहरात वाढलो, जिथे गंगा-जमुना संस्कृती आहे, मला रामलीला पहायला खूप आवडते. भगवान राम सर्वांमध्येच चांगुलपणा पहातात. त्याचा वारसा पुढे नेला पाहिजे. मी आपणा सर्वांना विनंती करतो की द्वेष करणार्या एजंट्सला प्रेम आणि ऐक्याच्या मार्गात येऊ देऊ नये.”
Growing up in Allahabad,a city with Ganga-Jamuna culture,I loved watching Ramlila-a tale of compassion,co-exsistence,honour and dignity.Lord Ram saw goodness in everyone and our conduct should reflect his legacy.Don’t allow the agents of hate to come in the way of love and unity.
— Mohammad Kaif (@MohammadKaif) August 5, 2020
भारताचा स्टार खेळाडू सुरेश रैनानेही राम मंदिर भूमी पूजनाच्या निमित्ताने संदेश दिला. रैना यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “रामजन्मभूमी अयोध्येत भव्य राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात येत आहे. त्याबद्दल देशवासियांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. देशात बंधुता आणि शांतता आणि आनंद वाढवे ही माझी इच्छा आहे.”
https://twitter.com/ImRaina/status/1290871017104121857
सलामीचा फलंदाज शिखर धवन याने लिहिले की, “आजचा दिवस हा सेलिब्रेशनचा दिवस आहे. तो दिवस इतिहासाच्या पानांमध्ये नोंदविला जाईल. यात सहभागी प्रत्येकाचे अभिनंदन.”
Today is a day of celebration and one that will go down in the history books. Congratulations to everyone involved. #RamMandir
— Shikhar Dhawan (@SDhawan25) August 5, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “श्रीराम यांचे मंदिर आपल्या संस्कृतीचे आधुनिक प्रतीक बनेल. हे आपल्या शाश्वत श्रद्धेचे प्रतीक, राष्ट्रीय भावनेचे प्रतीक बनेल आणि हे मंदिरही कोट्यावधी लोकांच्या सामूहिक सामर्थ्याचे प्रतीक बनेल. राम मंदिराशी परस्पर प्रेम व बंधुतेच्या संदेशाशी जोडले पाहिजे, जेव्हा जेव्हा श्रीरामावर विश्वास ठेवला तेव्हा विकास झाला आहे, जेव्हा आम्ही भटकलो आहोत तेव्हा विनाश झाला आहे.”