आजचा दिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. यादरम्यान अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपल्या गुरुजनांची आठवण काढत त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. यादरम्यान समालोचन करतेवेळी सबा करीम आणि विवेक राजदान यांनी आपल्या शिक्षकांची आठवण काढत चर्चा केली.
विवेक राजदान यांनी या दरम्यान सांगितले की, कशा प्रकारे ते बारावीच्या वर्गात असताना अकाउंट आणि गणित त्यांना अवघड जायचे. मात्र आज ते जे काही आहेत, ते त्यांच्या शिक्षकांमुळे आहेत. मात्र जेव्हा सेहवाग आणि मोहम्मद कैफ यांना हा प्रश्न करण्यात आला, त्यावेळी एक खूप मजेदार किस्सा घडला.
शिक्षक दिनाबद्दल विचारले असता, त्यावर कैफ म्हणाला, “माझे तिथपर्यंत पोचण्यात माझ्या आयुष्यात माझ्या शिक्षकांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. माझे आई वडील माझे पहिले शिक्षक आहे. तसेच माझे भाऊ-बहीण देखील माझ्यासाठी शिक्षक होते. ज्यांनी मला खूप काही शिकवले.” मात्र यानंतर कैफने जे उत्तर दिले ते आश्चर्यकारक असे होते. यावर सेहवाग म्हणाला, “तू तर षटकार मारला. तू तर चेंडूला सीमारेषा बाहेर पाठवले. मात्र तुझ्यामुळे आता मला मार खावा लागू शकतो.”
झाले असे की, याबाबत पुढे बोलताना कैफ म्हणाला होता, “माझी पत्नी पूजा ही देखील माझी खूप मोठी शिक्षक राहिली आहे. तिच्याकडून मी खूप काही शिकलो आहे.” कैफ असे म्हणताच स्टुडिओमध्ये हशा उठल्या.
यावर सेहवाग म्हणाला, “कैफु आता तर आम्हाला देखील आमच्या पत्नीचे आभार मानावे लागतील, नाहीतर घरी जाऊन मार खाण्याची पाळी येईल.”
यानंतर सेहवागदेखील म्हणाला की, “माझी पत्नी देखील माझी खूप मोठी शिक्षक राहिली आहे. मी तिच्याकडून खूप काही शिकलो आहे. ती आजही दररोज माझ्या इंग्लिशमध्ये सुधार करण्यात मला मदत करते.”
एकंदरीत या प्रश्नामुळे समालोचकांमध्ये झालेली ही चर्चा खूप रंगतदार झाली. ज्याचा चाहत्यांनीदेखील आनंद घेतला.
महत्वाच्या बातम्या –
–“देवासाठी तरी त्याला सोडा आणि पुढे चला”, रहाणे शुन्यावर बाद झाल्यानंतर पडतोय मीम्सचा पाऊस
–रोहित शर्माचे शतक म्हणजे भारताचा विजय पक्का, ही खास आकडेवारी देते पुरावा
–मोठी बातमी! रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी उतरणार नाही, ‘हे’ आहे कारण