पाकिस्तान आणि बांग्लादेश रावळपिंडी येथे पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटी सामन्यादरम्यान मोठा वादही पाहायला मिळात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत पोहोचला असला तरी यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. रिझवान अगदी जवळ असतानाही कर्णधार शान मसूद त्याला जाणूनबुजून द्विशतक करू दिले नाही, असा आरोप होत आहे.
वास्तविक पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. संघाने अवघ्या 16 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर मोहम्मद रिझवानने जबरदस्त खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. रिझवानने 239 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद171 धावांची खेळी केली. रिझवान त्याच्या द्विशतकापासून 29 धावा दूर होता. त्यानंतर कर्णधार शान मसूदने डाव घोषित केला. त्याने पाकिस्तानचा पहिला डाव 448/6 धावांवर घोषित केला.
यानंतर शान मसूदवर बरीच टीका होत आहे. सोशल मीडियावरही त्याच्यावर फिक्सिंगचे आरोप झाले होते. रिझवानला द्विशतक पूर्ण करता आले नाही म्हणून मसूदने मुद्दाम डाव घोषित केला, असे अनेक चाहत्यांचे मत आहे.
अगदी वाईट निर्णय. पाकिस्तानला मोठी धावसंख्या करता यावी आणि बांगलादेशला पुनरागमन करण्याची संधी मिळू नये यासाठी तिसऱ्या दिवसापर्यंत फलंदाजीला परवानगी द्यायला हवी होती.
Ridiculous declaration . Should have continued to bat into the third day and racked up a huge score so they didn’t have to bat again….
— jonny walker (@thedong6926) August 22, 2024
Mohammad Rizwan 171 not out
Sarfraz fans: pic.twitter.com/UclTI5ydDZ
— یاور کھوکھر (@yawarkhokhar1) August 22, 2024
रिझवानचे अभिनंदन, पण मला वाटते की त्याला द्विशतक पूर्ण करण्याची संधी मिळायला हवी होती.
Congratulations to Rizwan. Though I thought they’d let him convert to a double.
— Chirag Wakaskar (@chiragwakaskar) August 22, 2024
हेही वाचा-
क्रिकेटविश्वात खळबळ! भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी दिग्गज खेळाडूवर हत्येचा आरोप
निवृत्तीच्या अफवांमध्ये, केएल राहुल मैदानात! पाहा व्हायरल व्हिडिओ
आयसीसीची विशेष योजना, आता टी20 प्रमाणे कसोटी खेळाडूंवरही होणार पैशांचा वर्षाव!