सध्या वेस्ट इंडिज संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये ३ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडणार आहे. टी२० मालिकेतील पहिला टी२० सामना सोमवारी (१३ डिसेंबर) पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघातील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत वेस्ट इंडिज संघावर ६३ धावांनी विजय मिळवला. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान, या सामन्यातील पहिल्या डावात तुफान अर्धशतकी खेळी करणाऱ्या मोहम्मद रिजवानच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
पाकिस्तान संघाचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिजवान आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. हीच कामगिरी त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू आलेल्या सामन्यात देखील सुरू ठेवली आहे. त्याने पहिल्या टी२० सामन्यात ५२ चेंडूंमध्ये १० चौकारांच्या साहाय्याने ७८ धावांची तुफानी खेळी केली. या तुफानी खेळीच्या जोरावर त्याने २०२१ वर्षात टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२०० धावा पूर्ण केल्या आहेत. तो असा कारनामा करणारा पहिला आणि सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.
मोहम्मद रिजवानने २७ सामन्यातील २४ डावात १२०० धावा करण्याचा कारनामा केला आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १३२.२६ होता. त्याने ७५.०६ च्या सरासरीने फलंदाजी करत ११ अर्धशतक आणि १ झळकावले आहे. ही २०२१ मधील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने यावर्षी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले १०० षटकार देखील पूर्ण केले आहेत.
तसेच भारतीय फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा याबाबतीत मोहम्मद रिजवानच्या आसपास देखील नाहीये. या दोन्ही दिग्गजांना एकाच वर्षात टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावांचा पल्ला देखील गाठता आला नाहीये. विराट कोहलीने २०१६ मध्ये टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६४१ धावा केल्या होत्या, तर रोहितने २०१८ साली ५९० धावा केल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करणारे
१२००* – मोहम्मद रिजवान, २०२१
८५३ – बाबर आझम, २०२१
७४८ – पॉल स्टर्लिंग, २०१९
७२९ – केविन ओ’ब्रायन, २०१९
७०२ – मॅक्सवेल ओ’डॉड, २०१९
६८९ – शिखर धवन, २०१८
६७८ – मार्टिन गप्टील, २०२१
६४१ – विराट कोहली, २०१६
६३७ – बेंजामिन कुपर, २०१९
६२७ – मिशेल मार्श, २०२१
६०१ – अँड्र्यू बलबर्नी, २०१९
५९० – रोहित शर्मा, २०१८
Crucial breakthrough for West Indies!
Romario Shepherd gets his second wicket as Mohammad Rizwan walks back for a brilliant 78 👏
Watch #PAKvWI on https://t.co/CPDKNxoJ9v (in selected regions) 📺
📝 https://t.co/CzFuZiYxoo pic.twitter.com/ix9n6qEcbq
— ICC (@ICC) December 13, 2021
Mohammad Nawaz's stunning 10-ball 30* and fifties from Mohammad Rizwan and Haider Ali propel Pakistan to 200/6 💥
Can West Indies chase it down? 👀
Watch #PAKvWI on https://t.co/CPDKNx77KV (in selected regions) 📺
📝 https://t.co/CzFuZiGVZO pic.twitter.com/rM4z1Gge5a
— ICC (@ICC) December 13, 2021
तसेच त्याच्या एकूण कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत आपल्या टी२० कारकिर्दीत १३५ डावात ३९ च्या सरासरीने ३८६२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि २७ अर्धशतक झळकावले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
“खराब फॉर्ममध्ये असूनही विराट संघासाठी योगदान देतोय”
चिंतेचा डोंगर डोक्यावर घेऊन साहा खेळला न्यूझीलंडविरुद्धची मालिका; वाचा काय घडलेले
भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाची आपल्याच संघसहकाऱ्यांना चेतावणी; म्हणाला…