पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर शनिवारी (३१ जुलै) या मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान संघाने ७ धावांनी विजय मिळवला आहे. यासह त्यांनी टी-२० मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दरम्यान पाकिस्तान संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान याने एक मोठा कारनामा केला आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाला २० षटक अखेर ८ बाद १५७ धावा करण्यात यश आले होते. या डावात पाकिस्तानी कर्णधार बाबर आजम याने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. तसेच मोहम्मद रिजवान याने ४६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघातील फलंदाजांना २० षटक अखेर ४ बाद १५० धावा करण्यात यश आले. हा सामना वेस्ट इंडिज संघाने ७ धावांनी गमावला. वेस्ट इंडिज संघाकडून निकोलस पूरनने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. (Mohammad Rizwan breaks Paul Stirling record to score most T20I runs in calendar year)
मोहम्मद रिजवानचा विश्वविक्रम
पाकिस्तान संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान हा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच फॉर्ममध्ये आहे. तो पाकिस्तान संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावत आहे. त्याने या सामन्यात ३६ चेंडुंमध्ये २ चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने ४६ धावांची खेळी केली. यासह तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने २०२१ मध्ये आतापर्यंत ७५२ धावा केल्या आहेत. याबाबतीत त्याने आयर्लंड संघाचा फलंदाज पॉल स्टर्लिंग मागे सोडले आहे. त्याने ७४८ धावा केल्या होत्या.
एकाच वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
मोहम्मद रिजवान -७५२ धावा
पॉल स्टर्लिंग -७४८ धावा
केविन ओब्रायन -७२९ धावा
शिखर धवन -६८९ धावा
विराट कोहली -६४१ धावा
रोहित शर्मा -५९० धावा
फखर जमान -५७६ धावा
महत्वाच्या बातम्या-
आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या आपल्या दोन्ही भारतीय शिष्यांचे मॅकग्राने केले अभिनंदन, म्हणाला…
अबब! पंड्या बंधूंनी मुंबईत घेतला ३० कोटींचा अलिशान फ्लॅट, ‘या’ बॉलीवुड ताऱ्यांचे होणार शेजारी
इंग्लिश क्रिकेटपटू टाकणार ऍशेसवर बहिष्कार? ‘हे’ आहे कारण