आशिया चषकातील तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान संघात चालू झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमीला संघाच्या प्लेइंग 11 दिसला नाही. भारतीय संघाने 3 वेगवान गोलंदाजांना संघात संधी दिली आहे. यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर यांचा समावेश आहे. शमीची संघात निवड न झाल्यामुळे सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत.
जागतिक अजिंक्य कसोटीपद 2023 च्या अंतिम सामन्यानंतर दीर्घ विश्रांतीनंतर मोहम्मद शमी (Mohammad Shami) चा आशिया चषकाच्या संघात समावेश करण्यात आला. या सामन्यात तो खेळणार हे जवळपास निश्चित होईल अशी सर्वांनाच अपेक्षा होती, परंतु भारतीय संघ व्यवस्थापनाने शमीला बाहेर ठेवण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या दरम्यान, संघाच्या फलंदाजीला सखोलता प्रदान करण्याचा विचार केला जात आहे, ज्यामध्ये शार्दुल एक फलंदाज म्हणून संघासाठी उपयुक्त ठरू शकतो.
श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराहचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे
4 वर्षांनंतर एकदिवसीय प्रकारात पाकिस्तानविरुद्ध खेळणाऱ्या भारतीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर यांचे दीर्घ कालावधीनंतर वनडे संघात पुनरागमन झाले आहे. अय्यर त्याच्या पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि मधल्या फळीत पुन्हा महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे. भारतीय संघासाठी ही स्पर्धा विश्वचषकापूर्वी तयारीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, जिथे संघ आपल्या कमतरेतेवर मात करण्याचा प्रयत्न करताना दिसेल.
खेळ चालू असताना भारतीय संघाचा कर्णधार रोहितला आणि विराटला तंबूत परत पाठवे आहे. दरम्यान रोहितने 22 चेंडूत 11 धाव केल्या तर विराटने 7 चेंडूत केवळ एक चौकारासह 4 धावा केल्या (mohammad shami not include in team india playing 11 against pakistan)
महत्वाच्या बातम्या-
IND vs PAK । धावांपेक्षा दुप्पट चेंडू खेळून रोहित बाद! शाहीन आफ्रिदीने उडवला त्रिफळा
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर गंभीर नाराज! म्हणाला, “त्याला का बसवले?”