रविवारी (६ फेब्रुवारी ) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने हटके सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा मैदानावर नेहमी आक्रमक भूमिकेत दिसून आला आहे. फलंदाजाला बाद केल्यानंतर त्याने अनेकदा हटके सेलिब्रेशन केले आहे. हाच हटके सेलिब्रेशनचा अंदाज वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात देखील दिसून आला आहे.
या सामन्यात मोहम्मद सिराजला केवळ एक गडी बाद करण्यात यश आले होते. त्याने वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज शाय होपला त्रिफळाचित करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर गडी बाद करण्याचा जल्लोष साजरा करताना त्याने प्रसिध्द फुटबॉलपटू क्रिस्टीयानो रोनाल्डोचे ‘सियु’ सेलिब्रेशन करताना दिसून आला होता. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच यापूर्वी देखील अनेकदा त्याने असे सेलिब्रेशन केले आहे.
https://twitter.com/its_me_shikhar/status/1490239005526429697?t=nRP6NEwiKMd2OgGnZ_94Iw&s=19
युझवेंद्र चहलच्या ४ आणि वॉशिंग्टन सुंदरच्या ३ गडी बाद करण्याच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाचा डाव १७६ धावांवर संपुष्टात आणला होता. वेस्ट इंडिज संघाकडून जेसन होल्डरने सर्वाधिक ५७ धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ३४ धावांचे योगदान दिले. हा सामना भारतीय संघाने ६ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
कोरोनासारख्या संकटांवर मात करत यश धूलच्या भारतीय संघाने जिंकला विश्वचषक, वाचा संघाचा संपूर्ण प्रवास
रोहितच्या नेतृत्वात २०२२ मध्ये फुटला टीम इंडियाच्या विजयाचा नारळ; वेस्ट इंडीजवर केली ६ गड्यांनी मात
वर्षभरापूर्वी वाटलेले कारकीर्द संपणार; आता पठाण बंधूंच्या पाठींब्याने हुडा खेळला भारतीय संघात






