---Advertisement---

फलंदाजासाठी नाही, तर टीकाकारांना प्रतिउत्तर देण्यासाठी ‘ते’ खास सेलिब्रेशन करतो मोहम्मद सिराज, स्वत:च केलाय खुलासा

On: रविवार, ऑगस्ट 15, 2021 4:47 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लोर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने मजबूत पकड बनवली आहे. तसेच भारतीय गोलंदाजांनी देखील आक्रमक गोलंदाजी केली. दरम्यान, मोहम्मद सिराजने फलंदाजाला बाद केल्यानंतर तोंडावर बोट ठेवल्याचे सेलिब्रेशन केले होते. हे सेलिब्रेशन दिनेश कार्तिकला आवडले नव्हते, तसेच अनेकांनी मोहम्मद सिराजवर जोरदार टीका केली होती. आता मोहम्मद सिराजने या सेलिब्रेशनमागे नक्की काय आहे,याचा खुलासा केला आहे.

मोहम्मद सिराज हा भारतीय संघाचा आक्रमक गोलंदाज आहे. त्यामुळे फलंदाजाला बाद केल्यानंतर तो तोंडावर बोट ठेवत जोरदार सेलिब्रेशन करताना दिसून येतो. हे सेलिब्रेशन अनेकांना आवडत असले तरी, भारतीय यष्टिरक्षक फलंदाज आणि सध्या समालोचकाची भूमिका पार पाडत असलेल्या दिनेश कार्तिकला आवडले नाही.

त्याने टेलीग्राफमध्ये लिहिले होते की,”मला असे वाटते की, सिराजने फलंदाजाला बाद केल्यानंतर तोंडावर बोट ठेवल्याचा इशारा करायची गरज नव्हती. तुम्ही त्याला आधीच बाद केले आहे. मग बाद केल्यानंतर असा इशारा करण्याची गरज काय? सिराजच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा पहिला धडा आहे.”(Mohammad siraj explains his shit up celebration on which dinesh Karthik became angry)

मोहम्मद सिराजने सांगितले हे सेलिब्रेशन करण्यामागचे कारण
मोहम्मद सिराजने म्हटले की, “हे सेलिब्रेशन त्या टीका करणाऱ्यांसाठी आहे, ज्यांना वाटते की, ही गोष्ट नाही करू शकत, मी ते नाही करू शकत.” सिराजच्या म्हणण्यानुसार, हे सेलिब्रेशन तो बाद झालेल्या फलंदाजाला चिडवण्यासाठी करत नाही, तर त्याला कमी लेखणाऱ्या लोकांसाठी करतो.

इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने सुरुवातीलाच इंग्लंड संघातील मुख्य फलंदाजांना माघारी धाडले होते. परंतु, तो ५ गडी बाद करण्यापासून मुकला. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात ३० षटक गोलंदाजी केली. यामध्ये त्याने ९४ धावा देत ४ गडी बाद केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

क्रिकेटसाठी काही पण! दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर राहिलेला अय्यर ‘या’ कारणामुळे एकटाच पोहोचला युएईत

डीआरसाठी आख्खा संघ जमतो, इकडं हसून माझं पोट दुखतं; इंग्लंडच्या दिग्गजाकडून भारताची थट्टा

सामना सुरू असताना लॉर्ड्सच्या बाल्कनीत रवी शास्त्री घेत होते डुलक्या, फोटो होतोय तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---